बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत नुकतीच ‘धाकड’ चित्रपटात दिसलेली आहे.अभिनेत्रीने शी इज ऑन फायर या गाण्याचा टीझर रिलीज केला आहे.गाण्याच्या टीझरमध्ये कंगना राणौतचा बो’ल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
या गाण्याचा टीझर कंगनाने इन्स्टाग्रामवर रिलीज केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गाण्याचा हा बो’ल्ड टीझर व्हिडिओ आणि त्यात कंगनाची स्टाईल पाहिल्यानंतर आता या संपूर्ण गाण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
बादशाहने गाणे गायले
शी इज ऑन फायर या गाण्यात बादशाहने आवाज दिला आहे.या गाण्यात कंगना रणौत व्यतिरिक्त अर्जुन रामपाल देखील दिसणार आहे. या गाण्यात कंगना राणौतचे अनेक अवतार पाहायला मिळतील. टीझर शेअर करताना कंगनाने लिहिले की, ‘आग इतकी भीषण आहे की अ’ग्नि’श’म’न दलही ती विझवू शकत नाही.
कंगना अॅक्शन सीन्स
‘धाकड’ हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून यामध्ये कंगनाचा अॅक्शन अवतार पाहायला मिळाला आहे. बंदूक चालवण्यापासून ते खलनायकाशी लढण्यापर्यंत ती या चित्रपटात दिसलेली आहे. रजनीश घई यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.या चित्रपटात कंगना रणौतशिवाय अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता आहेत.
2021 मध्ये रिलीज झालेल्या ‘थलायवी’ चित्रपटानंतर आता कंगना राणौतचा ‘धाकड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तसे, सध्या कंगना रिअॅलिटी शो लॉकअप होस्ट करत आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये ‘तेजस’ आणि ‘टिकू वेड्स शेरू’ हे चित्रपटही आहेत.