सनी लियोनीने बॉलिवूड मध्ये जरी जास्त चित्रपट केले नसतील, मात्र आपल्या खास गाण्यांच्या जोरावर तिने चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सनी लियोनीची इंस्टाग्रामवर बऱ्यापैकी चाहत्यांची यादी आहे. अभिनेत्रीचा अंदाज आणि तीच्या अभिनयाला चाहते खूप पसंत करतात.
सोशल मीडियावर सनी जेव्हापण काही पोस्ट करते तर तेव्हा ते लगेच व्हायरल होऊ लागते. हल्लीच सनी लियोनी ने एक खूपच सुंदर रील सोशल मीडियावर पोस्ट केला होता, ज्यामधे बॉलिवुड ची बेबी डॉल खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांना तीचे हे रील खूपच पसंत येत आहे. अगदी वेगाने ही पोस्ट व्हायरल होत आहे.
सनी लियोनी ने आपल्या इंस्टाग्राम खात्यावर एक रिल पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये ती पती डॅनियल सोबत फुटबॉल खेळत आहे. सनी लियोनी ने या व्हिडिओ मध्ये काजोल सारखी लाल रंगाची साडी घातली आहे आणि आपल्या पतीकडून फूटबॉल घेण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ मधील सनीचा लाल साडीमधील अंदाज चाहत्यांना खूप भावत आहे.
हा व्हिडिओ शेयर करताना सनीने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, ‘आपल्या चांगल्या मित्राला टॅग करा’ याच बरोबर आपल्या या व्हिडिओ सोबतच सनी लियोनीने शाहरुख खान आणि काजोलच्या समर कॅम्प दरम्यान सुंदर आठवणी पुन्हा एकदा ताज्या केल्या आहेत. काजोल झालेल्या सनी लियोनीने हा व्हिडिओ आपल्या चाहत्यांसोबत शेयर केला आहे.