कधीकाळी वडिलांच्या टी-स्टॉल शेजारी मिसळ पाव विकायचा हा डान्सर, शिपायाचीही केली होती नोकरी

धर्मेश येलांडे हे नाव आज संपूर्ण देशाला परिचीत आहे. धर्मेश येलांडेपेक्षाही धर्मेश सर या नावाने त्याला अधिक ओळखलं जातं. डान्स इंडिया डान्सपासून धर्मेश हे नाव घराघरात पोहोचलं आणि तिथूनच सुरु झाला धर्मेशच्या यशाचा प्रवास. धर्मेश आज एक प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर असला तरी त्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे. धर्मेशने एक दोन नाही तर तब्बल १८ वर्ष डान्सर म्हणून काम केलं त्यानंतर कुठे आता त्याला यशाची चव चाखण्यास मिळत आहे. धर्मेश गुजरातमधील एका सामान्य कुटुंबातील आहे.

धर्मेशने डान्स करणं त्याच्या आईला अजिबात आवडत नव्हतं. यामुळे त्या नेहमी त्याला अभ्य़ास करण्यास सांगायच्या. पण धर्मेश लपून डान्सच्या क्लासला जात आहे. यामुळे अनेकदा त्याला त्याच्या आईकडूनही मा-र खावा लागला. पण त्याच्या वडिलांचा पाठिंबा होता. आईपासून लपवून ते अनेकदा धर्मेशला पैसे देत असत आणि डान्स क्लासला पाठवत असत. धर्मेशच्या वडिलांचा टी-स्टॉल होता. त्याच्याच बाजूला धर्मेशला मिसळ पावचा स्टॉल सुरु करुन दिला होता.

त्यामुळे धर्मेशने काही काळ मिसळ पाव विकण्याचं कामही केलं होतं. स्टॉल सुरु करण्याआधी धर्मेशने शिपाई म्हणूनही काम केलं आहे. धर्मेशला डान्स क्लासला जायचं असायचं, पण ते लोक रात्री ९ च्या आधी सोडत नसल्याने धर्मेशने ती नोकरी सोडून दिली. जर मी सहा वाजता मोकळा झालो तर मी पैसे कमावून आणेन असंही धर्मेशने कुटुंबाला सांगितलं होतं. टी-स्टॉलवर काम करत असल्याने स्टोव्ह पेटवताना अनेकदा धर्मेशच्या वडिलांचा हात भाजत असे. ते पाहिल्यानंतर धर्मेशला खूप वाईट वाटायचं.

आपण डान्स किंवा कपड्यांसाठी पैसे मागायचो तेव्हा वडील नाही म्हणायचे नाहीत. पण ते पैसे देण्यासाठी हात पुढे करत तेव्हा भाजलेला हात दिसत असे असं धर्मेश सांगतो. यानंतर धर्मेशने डान्सकडे लक्ष वळवलं आणि काही मुलांना शिकवण्यासही सुरुवात केली. डान्स इंडिया डान्समध्ये मिळालेल्या संधीचं धर्मेशने सोनं केलं आणि त्याला इंडस्ट्रीचा दरवाजा खुला केला. यामुळेच तिथे त्याला धर्मेश सर अशी ओळख मिळाली आणि त्याच नावाने ओळखलं जावू लागलं. डान्स इंडिया डान्समधील अनेक स्पर्धेक हे धर्मेशचे विद्यार्थी होते.

एक स्पर्धेक म्हणून आलेला धर्मेश आता डान्स प्लस शोमध्ये जज म्हणून काम करतोय. धर्मेशला रेमो डिसुजाने आपल्या ABCD आणि इतर चित्रपटांमध्येही संधी दिली आहे. याशिवाय धर्मेशला फराह खानसोबत काम करण्याचीही संधी मिळाली. धर्मेश मुंबईत आल्यानंतर त्याची राहण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. यावेळी रेमोने त्याची काळजी घेतली. धर्मेश म्हणतो, जेव्हा कधी आई विचारते की मुंबईत जेवण वैगेरे इतर गोष्टींची काळजी कसा घेतोस तेव्हा रेमो सर असताना काळजी करायची गरज नाही असं सांगतो.

रेमो आपल्यासाठी वडिलांप्रमाणे असल्याचं धर्मेश सांगतो. धर्मेशससाठी रेमो, गीता आणि १८ वर्ष त्याला डान्स शिकवणारे रवी हे गुरु आहेत. तो नेहमी त्यांच्याबद्दल भरभरुन बोलत असतो. धर्मेशने गुजराती चित्रपटातही काम केलं आहे. याशिवाय मराठी डान्स शोमध्येही जज आहे. रेमोला आदर्श मानून मुंबईत आलेला धर्मेश आज त्याच्यात शोमध्ये जज म्हणून बसला असून संघर्ष आणि यशाचं उदाहरण देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *