बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडीयन जॉनी लीव्हरने 80 च्या दशकात आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि एकापाठोपाठ अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. जॉनीकडे आज करोडोंची संपत्ती आहे, पण एक वेळ अशी होती जेव्हा त्याला आर्थिक अडचणींमुळे शाळा सोडावी लागली होती.
भारतातील प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लीव्हरने 1984 मध्ये सुजातासोबत लग्न केले. यावर्षी ते त्यांचा 38 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. त्यांना जेमी लीव्हर आणि जेसी लीव्हर नावाची दोन मुले आहेत. जेमी एक स्टँड-अप कॉमेडियन आहे आणि मुलगी जेसी बहुतेक हिंदी चित्रपट उद्योगात तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे.
प्रतिभासंपन्न असलेल्या या अभिनेत्याने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी सुजातासोबत लग्न केले. जॉनी लीव्हरचा मुलगा जेसी लीव्हर याच्या मानेमध्ये घातक ट्यूमर झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे जॉनीला काही वर्षे चित्रपट सोडावे लागले.
जॉनी लीव्हरची पत्नी सुजाता सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसली तरी जॉनी आणि त्याची मुले अनेकदा सुजाताचे फोटो शेअर करतात.जॉनीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पत्नी सुजाताचे अनेक फोटो आहेत, जे पाहून प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचे कौतुक करतो.
