कधी रस्त्यावर पेन विकून तर कधी उपाशी पोटी काढले दिवस,अवघ्या भारताला पोट धरून हसवणाऱ्या जॉनी चा असा होता कडतळ जीवन प्रवास….

80 आणि 90 च्या दशकात जॉनी लीव्हरने हिंदी चित्रपटातील विनोदाची व्याख्या बदलून टाकली. जॉनी लीव्हर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील खूप मोठे नाव आहे. ज्याच्या अभिनयाचे आणि उत्कृष्ट विनोदाचे सर्वांनी कौतुक केले आहे, व जॉनीला आज कॉमेडीचे प्रतीक मानले जाते. जॉनी लीव्हरचा जन्म 14 ऑगस्ट 1957 रोजी आंध्र प्रदेशातील कानिगिरी येथे झाला.

जॉनी लीव्हरचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता. जॉनी लिव्हरने लहान वयातच घराची आर्थिक स्थिती सुधारण्याची जबाबदारीही आपल्या खांद्यावर घेतली होती आणि यामुळे त्याने आपला अभ्यास सोडून रस्त्यावर पेन विकायला सुरुवात केली. मनोरंजक आणि विशेष गोष्ट म्हणजे तो नृत्य करून पेन विकण्याचे काम करत असे.

उल्लेखनीय म्हणजे जॉनी लीव्हरला भारताचे पहिले स्टँड-अप कॉमेडियन देखील म्हटले जाते. जॉनी लीव्हरचे खरे नाव जॉन प्रकाश राव जनुमाला हे आहे. 350 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये दिसणारा जॉनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यापूर्वी हिंदुस्तान लीव्हर कंपनीमध्ये काम करायचा. तेथे त्याचे काम शारीरिकदृष्ट्या खूप कठोर होते.

या दरम्यान, जॉनी 100 किलोपेक्षा जास्त वजनाचा ड्रम अगदी सहज उचलून तो एका ठिकाणाहून दुस -या ठिकाणी पोहोचवत असे. जॉनी लीव्हरला सुरुवातीपासूनच कॉमेडी आणि अभिनयाची आवड होती. हिंदुस्थान लीव्हरमध्ये काम करत असताना त्याचे नाव जॉनी लीव्हर असे पडले होते. मग पुढे तो या नावाने संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला.

तसेच जॉनी ने 13 वेळा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला आहे. जॉनी लीव्हर केवळ कॉमेडीमध्येच तज्ज्ञ नाही, तर तो एक मिमिक्री कलाकार देखील आहे. बॉलिवूडमध्ये कारकीर्द सुरू होण्यापूर्वी त्याने अनेेक स्टेज शो ही केले होते. स्टेज शो दरम्यान त्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि दिवंगत अभिनेता सुनील दत्त यांनाही प्रभावित केले होते.

वास्तविक, सुनील दत्तही जॉनीचा एक स्टेज शो पाहण्यासाठी पोहोचला आला होता. जॉनीचा शो पाहून सुनील दत्तला त्याचे काम आवडले आणि सुनील दत्तने जॉनीला विलंब न लावता त्याने त्याचा ‘दर्द का रिश्ता’ हा चित्रपट ऑफर केला. अशाप्रकारे जॉनीचे फिल्मी करिअर सुरू झाले. यानंतर जॉनीने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि तो यशाच्या शिखराला स्पर्श करत राहिला.

जॉनीची गणना त्याच्या काळातील अत्यंत व्यस्त कलाकारांमध्ये केली जाते. याचा अंदाज यावरून घेता येतो की 2000 साली त्याचे 25 चित्रपट प्रदर्शित झाले. एका वर्षात सर्वात मोठ्या सुपरस्टारचे जास्तीत जास्त 3 ते 4 चित्रपट प्रदर्शित होतात, पण जॉनीचेे एकाच वर्षात एकूण 25 चित्रपट प्रदर्शित झाले होते.

फार कमी लोकांना ही गोष्ट माहित आहे की जानी लीव्हरने जेलची हवाही खाल्ली आहे, त्याच्यावर तिरंगा अपमानाचा आरोप होता. मात्र, नंतर त्याच्यावरील हा आरोप काढण्यात आला. या प्रकरणात जॉनीला 7 दिवस तुरुंगवास भोगावा लागला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *