जेव्हा लतादीदींना वि ष देऊन जी वे मा रण्याचा झाला प्रयत्न, ह्या कारणामुळे काहीही करता आले नाही

गायन कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर ह्यांच्या आवाजाची जादू आजही कायम आहे. अख्ख्या जगात त्यांच्या आवाजाचे बरेच चाहते आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का , की वयाच्या ३३ वर्षी लतादीदींना जी वे मा र ण्या चा प्रयत्न केला गेला. ह्याबद्दल त्या कधी कुठे बोलल्या नाही परंतु काही दिवसांपूर्वीच ह्या गोष्टीचा खुलासा त्यांनी केला.

लता दीदींनी नुकत्याच एका मुलाखतीत असे सांगितले की , “आमच्या परिवारात कोणी ह्याबद्दल काही वार्ता करत नाही. तो काळ आमच्या जीवनातील सर्वात भयंकर काळ होता. १९६३ ची गोष्ट आहे जेव्हा मला खूप अशक्तपणा आला होता आणि मी अंथरुणावरून उठू सुद्धा शकत नव्हते. स्वतःहून चालता फिरता येत नव्हते.”

त्या काळी अशा बातम्या सुद्धा पसरल्या होत्या की त्यांना वि ष देण्यात आले त्यामुळे त्यांचा आवाज गेला. डॉक्टरांनी तर त्यांना असं सांगितलं होतं की त्यांना पुन्हा गाता येणार नाही. ह्या बाबतीत जेव्हा दीदींना विचारले गेले तेव्हा त्यांनी सर्व गोष्टी खोट्या आहेत असे सांगितले. ह्या सर्व गोष्टी काल्पनिक आहेत. डॉक्टरांनी मला असे कधीच सांगितले नाही की मी पुन्हा गाऊ शकणार नाही असे दीदी सांगतात.

लतादीदी पुढे सांगतात ,”ही गोष्ट खरी होती की मला वि ष देण्यात आले होते, डॉक्टर कपूर ह्यांच्या उपचाराने आणि माझ्या मनातील दृढ निश्चयामुळे मी परत येऊ शकले. तीन महिने बिछान्यावर पडून राहिल्यानंतर पुन्हा मी गाणं गायला समर्थ झाले.” ठीक झाल्यावर लता दीदींनी ‘कही दीप जले कही दिल’ गाणे गायले जे मोठ्या प्रमाणात गाजले आणि ह्या गाण्याला फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा मिळाला.

ह्यासोबतच जेव्हा दीदींना विचारले गेले की तुम्हाला माहीत पडले का की कोणी तुम्हाला वि ष दिले ? त्यावर त्या म्हणाल्या , “हो , मला माहित पडले होते, पण आम्ही कोणती ऍकशन नाही घेतली कारण आमच्याकडे त्या माणसाविरुद्ध काही पुरावा नव्हता”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *