बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर फक्त आपल्या हिट सिनेमांमुळेच नाही तर सध्या फिटनेस साठी सुद्धा ओळखला जातो. त्याला बघून त्याच्या वयाचा अंदाज लावणं सुद्धा कठीण जातं. पण ह्या साठी तो रोज खूप मेहनत करतो.
अनिल कपूरने ‘वो सात दिन’ ह्या सिनेमातून फिल्मी दुनियेत पदार्पण केले आणि त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी एकामागे एक सुपरहिट सिनेमांमध्ये कामे केली. त्यासोबतच ‘बेटा’, ‘जीवन एक संघर्ष’ आणि ‘प्रतिकार’ सारख्या फिल्ममध्ये अनिलने माधुरी दीक्षित सोबत काम केले.
दोघांची जोडी सुपरहिट झाली होती. बेटा हा दोघांचा सोबतचा पहिला चित्रपट होता आणि त्या सिनेमानंतर त्यांच्या अफेयरच्या बातम्या सगळीकडे पसरू लागल्या. त्या काळी माधुरीचं नाव जॅकी श्रॉफ, मिथुन चक्रवर्ती आणि संजय दत्त सारख्या अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते.
पण जेव्हा अनिल कपूर सोबत तिचं नाव जोडलं गेलं तेव्हा तिने ह्यावर आपलं मौन तोडलं. १९८९ साली एक इंटरव्ह्यूमध्ये माधुरी म्हंटली की , ” मी अशा माणसासोबत कधीच लग्न करणार नाही, तो खूप भावुक आहे. माझा नवरा खूप कूल असावा अशी माझी इच्छा आहे. मी अनिलसोबत बऱ्याच सिनेमात कामे केली त्यामुळे मी त्याच्यासोबत खूप कम्फर्टेबल फील करते. सेटवर मी माझ्या आणि अनिलच्या होणाऱ्या अफेअरबद्दल जोकही क्रॅक करते. ”
तसेच , अनिल कपूरने माधुरीसोबत लिंकअप च्या बातम्यांवर म्हंटलं की, ” मी बऱ्याच सुंदर अभिनेत्रींसोबत कामे केली आहेत. त्यामुळे प्रेमात पडण्याचे क्षण बऱ्याचदा माझ्या वाट्याला आले. पण मी नेहमी स्वतःला हाच प्रश्न केला की मला क्षणिक आनंद हवाय की आयुष्यभराचं सुख आणि मी माझ्या पत्नी सुनीता सोबत खूप सुखी आहे.