तसले गाणे शूट करण्यासाठी या आयटम गर्ल घेतात करोडो रुपये,जाणून थक्क व्हाल..

बॉलिवूड चित्रपट आणि गाण्यांचा दीर्घ संबंध आहे. येथे बनवलेल्या जवळजवळ प्रत्येक चित्रपटात तुम्हाला एक ना एक गाणं नक्कीच पाहायला मिळेल. चित्रपटांमध्ये गाणी जोडण्याचा एक मोठा फायदा म्हणजे जेव्हा ते लोकप्रिय होतात तेव्हा चित्रपटाला विनामूल्य प्रसिद्धी मिळते. तसेच आता काही काळापासून चित्रपटांमध्ये आयटम नंबर जोडण्याचाही ट्रेंड सुरू झाला आहे.

अनेक चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये आयटम साँग एड करायला आवडते. यामुळे त्यांच्या चित्रपटाच्या ग्लॅमरमध्ये आणखी भर पडते. यासोबतच चित्रपटाला भरपूर प्रमोशनही मिळते. आजकाल प्रत्येक, लहान असो किंवा मोठी अभिनेत्री चित्रपटांमध्ये आयटम नंबर करते. काही मिनिटांच्या या आयटम साँगच्या बदल्यात या अभिनेत्रींना चांगलीच रक्कम मिळते.

करीना कपूर
करीना हे बॉलिवूडमधील एक मोठे नाव आहे. तिची गणना अव्वल अभिनेत्रींमध्ये केली जाते. असे असूनही तीने चित्रपटात आयटम नंबर करणे टाळले नाहीये. ‘ये मेरा दिल प्यार का दीवाना’ हे तीचे पहिले आयटम साँग होते. यानंतर, ती फेविकॉल से, हलकट जवानी या सारख्या गाण्यांमध्ये आयटम नंबर करताना दिसली. करीना एक आयटम साँग करण्यासाठी 5 कोटी रुपये घेते.

मलायका अरोरा
मलायका अरोरा बॉलिवूडची सर्वात हॉट अभिनेत्री मानली जाते. ती चित्रपटांमध्ये अभिनयासाठी कमी आणि आयटम साँगसाठी जास्त ओळखली जाते. चल छैय्या छैय्या पासून मुन्नी बदनाम हुई पर्यंत मलायका ने बॉलीवूड मध्ये अनेक आयटम साँग केले आहेत. ती एका गाण्यासाठी 1 कोटी रुपये घेते.

सनी लिओन
एकेकाळी प्रौढ चित्रपटांचा भाग असणारी सनी लिओनी आज बॉलिवूडमध्ये एक परिचित चेहरा बनली आहे. सनीने तिच्या फिल्मी कारकिर्दीत अनेक हीट आयटम नंबर दिले आहेत ज्यात बेबी डॉल में सोने दी, लैला तेरी ले लेगी, पिंक लिप्स, देसी लुक, लैला मैं लैला इत्यादी गाण्यांचा समावेश आहे. या आयटम साँगसाठी सनी 3 कोटी रुपयांपर्यंत चार्ज घेते.

मल्लिका शेरावत
मल्लिका शेरावतची गणना बॉलिवूडच्या हॉट आयटम गर्ल्समध्ये केली जाते. जलेबी बाईपासून मैय्या मैय्यापर्यंत मल्लिका शेरावतने अनेक हॉट आयटम नंबर केले आहेत. तसेच ती एका गाण्यासाठी 1.5 कोटी रुपये घेते.

बिपाशा बसू
बिपाशा बसूने तिच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले आहेत. यासोबतच ती आयटम साँग करण्यासाठीही ओळखली जाते. बिडी जलई ले, बिल्लो राणी, टच मई कूछ असे काही आयटम साँग आहेत जी लोकांना अजूनही ऐकायला आवडतात. तसेेच बिपाशाा एका गाण्यासाठी एक कोटी रुपये घेते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *