ह्या अटीमुळे झालं अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाचं लग्न, पहिल्या वेळी मोडला होता साखरपुडा…

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार ह्याची पत्नी ट्विंकल खन्ना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मीडियात चर्चेत असते. ट्विंकलने बॉलीवूड मध्ये अभिनयाचे बरेच प्रयत्न केले पण तिच्या हाती यश काही लागले नाही त्यामुळे तिने अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम घातला. ह्या नंतर तिने आपले लक्ष आर्टिकल आणि पुस्तके लिहण्याकडे वळवले. अक्षय कुमार आणि ट्विंकल बऱ्याच इव्हेंट मध्ये एक दुसऱ्याची टर उडवताना दिसलेत. दोघांनी १९ वर्षांपूर्वी एकमेकांशी लग्न केले परंतु हे फक्त एका अतीमुळेच झाले.

राजेश खन्नाची मुलगी ट्विंकल खन्ना अक्षय सोबत लग्न करण्यास तयार नव्हती परंतु एका अटीमुळे त्यांना एकमेकांशी लग्न करावं लागलं. अक्षय कुमारची ट्विंकल सोबत पहिली भेट फिल्मफेयर च्या चित्रीकरणाच्या दरम्यान झाली होती. ट्विंकलला पाहताक्षणीच अक्षय तिच्यावर मोहित झाला आणि अभिनेत्री तिच्या नुकत्याच झालेल्या ब्रेकअप मुळे अपसेट होती. ह्या गोष्टीची मान्यता स्वतः ट्विंकल ने एका मुलाखतीत दिली की १५ दिवसांच्या आउटडोर शूटमुळे तिची आणि अक्षयची जवळीक वाढली होती.

आपलं ब्रेकअप विसरण्यासाठी तिने असं ठरवलं होतं की ती काही दिवस अक्षयसोबत वेळ घालवणार. ह्या दरम्यान त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी त्यांचा साखरपुडा झाला पण अक्षयचं नाव त्या काळात बऱ्याच दुसऱ्या अभिनेत्रींसोबत जोडलं जात होतं त्यामुळे तो साखरपुडा लवकरच मोडला. अक्षयच्या इतर अभिनेत्रींसोबतच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या ऐकून ट्विंकलने अक्षय सोबत लग्न न करण्याचे ठरवले. ह्या दरम्यान ती डिप्रेशन मध्ये गेली आणि तिची हालत खराब झाली.

अक्षयने खूप समजावूनही ट्विंकल मानण्यास तयार नव्हती. नंतर अक्षयच्या सारख्या सारख्या सांगण्यामुळे ट्विंकलने वेगळीच अट घातली. अक्षयने स्वतः असे सांगितले आहे की ट्विंकलची अट ही होती की जर तिचा ‘मेला’ हा सिनेमा नाही चालला तर ती लग्न करायला तयार होईल. ट्विंकलला विश्वास होता की आमिर सोबतचा हा सिनेमा नक्कीच हिट होईल. पण तो सिनेमा फ्लॉप ठरला आणि ट्विंकलला अक्षय सोबत लग्न करावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *