प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. पो’र्नो’ग्राफी प्रकरणी तो तुरुंगातही गेला होता पण आता तो जामिनावर बाहेर आहे.तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज आणि शिल्पाची एक बातमी जोरात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राज कुंद्राने आपली सर्व संपत्ती पत्नी शिल्पा शेट्टीला दिल्याचे समोर आले आहे. राज हे प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यापारी आहेत आणि त्यांच्याकडे करोडोंची संपत्ती होती.
राज कुंद्राने सुमारे 38.5 कोटी रुपयांची मालमत्ता शिल्पाला दिली. त्याच्या मालमत्तेत 4-5 मोठे आणि आलिशान फ्लॅट आणि जुहू, मुंबई येथे एक आलिशान बंगला आहे. त्याच्या या मालमत्तेबद्दल ऐकून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे आणि राज कुंद्राने असे का केले हे जाणून घ्यायचे आहे. त्याने आपली सर्व मालमत्ता शिल्पाच्या नावावर का केली?
या दोघांची ही बातमी खूप चर्चेत आहे. राज कुंद्राने आपली सर्व मालमत्ता शिल्पा शेट्टीकडे हस्तांतरित केल्यानंतर, राजने एवढे मोठे पाऊल का उचलले हे त्याच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. यापूर्वी राज यांना अश्लील चित्रपट बनवण्याच्या एका प्रकरणात तुरुंगात जावे लागले होते. त्यानंतर राज कुंद्राची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर राज आपल्या कुटुंबासोबत राहत आहे आणि आपला सर्व वेळ त्यांच्यासोबत घालवत आहे. मात्र लवकरच तो पुन्हा तुरुंगात जाऊ शकतो, असे बोलले जात आहे. त्यामुळे त्याने जाणीवपूर्वक आपली सर्व मालमत्ता पत्नीच्या नावावर केली.
शिल्पा शेट्टीने हिसकावून घेतली राज कुंद्राची सर्व मालमत्ता, करोडोंची संपत्ती….
