ही बॉलीवूड जोडपी त्यांच्या वयातील अंतरामुळे झाली आहेत ट्रोल, घ्या जाणून….

जेव्हा बॉलिवूड सेलिब्रिटी प्रेमात पडतात तेव्हा त्यांना वय, धर्म आणि जात काही फरक पडत नाही. असेही काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आपल्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीशी लग्न केले आहे. काही बॉलीवूड सेलिब्रिटींची यादी घेऊन आलो आहोत जे अनेकदा वयाच्या अंतरामुळे ट्रोल होतात.

१) मलायका अरोरा – अर्जुन कपूर

अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर ४९ वर्षीय मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे अर्जुनचे वय केवळ 37 वर्षे आहे. त्यामुळे त्यांना अनेकदा ट्रोल व्हावे लागते.

२) करीना कपूर खान- सैफ अली खान

सैफ अली खानने पहिल्यांदा अमृता सिंगशी लग्न केले होते, जी स्वतःपेक्षा 12 वर्षांनी मोठी होती, तरीही त्यांचा लवकरच घटस्फोट झाला होता. यानंतर सैफने स्वतःहून 10 वर्षांनी लहान अभिनेत्री करीना कपूरसोबत लग्न केले. त्यामुळे त्यांना खूप ट्रोल व्हावे लागले आहे.

३) प्रियांका चोप्रा- निक जोनास

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने 2018 साली अमेरिकन पॉप स्टार निक जोनाससोबत लग्न केले. यानंतर तीच्या भारतीय चाहत्यांचे हृदय तुटले. प्रियांका निकपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे, ज्यामुळे यूजर्स तिला आई-मुलाची जोडी म्हणत सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.

4) शाहिद कपूर – मीरा राजपूत

अभिनेता शाहिद कपूरने दिल्लीच्या मीरा राजपूतशी लग्न केले आहे हे सर्वांनाच माहिती आहे, परंतु त्यांच्या वयात १३ वर्षांचा फरक आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. शाहिद 41 वर्षांचा आहे तर मीरा फक्त 28 वर्षांची आहे. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागले आहे.

५) कतरिना कैफ- विकी कौशल

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. 38 वर्षीय कतरिना आणि 33 वर्षीय विकी कौशल यांच्या वयातील अंतराचीही अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होते.

६) हृतिक रोशन – सबा आझाद

बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशनही त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे. सुझानपासून घटस्फोट घेतल्यानंतर हृतिक अभिनेत्री आणि मॉडेल सबा आझादला डेट करत आहे. एअरपोर्टवर गर्लफ्रेंड सबा आझादसोबत हातात हात घालून दिसला हृतिक रोशन, यूजर्सनी केला ट्रोल

7) रणबीर कपूर- आलिया भट्ट

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. या जोडप्याने एप्रिल 2022 मध्ये लग्न केले आणि नोव्हेंबरमध्ये त्यांना मुलगी झाली. रणबीर आणि आलियाच्या वयातही १० वर्षांचा फरक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *