बॉलिवुड असो किंवा सिनेमाशी संबंधीत चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींना यशस्वी झाल्यानंतर लग्न करायचे असते, ज्यामुळे एग्ज फ्रिज करणे खूपच सामान्य गोष्ट होत चालली आहे. चित्रपसृष्टीशी संबंधीत अशा अनेक अभिनेत्रीया आहेत, ज्यांनी आपले एग्ज आणि एम्ब्रियो फ्रिज केले आहेत. ही एक अशी वैद्यकीय प्रक्रिया आहे ज्यामुळे त्यांना वाढत्या वयात आई बनणे सोपे होते.
एका ठराविक वयानंतर महिलांचे आई बनणे अवघड होऊन जाते. अशाच काही अभिनेत्री आहेत ज्यांनी या वैद्यकीय मार्गाचा वापर करून आपले एग्ज फ्रिज केले आहेत आणि वाढत्या वयात देखील आपले आई होयचे स्वप्न पूर्ण केले आहे.जाणून घेऊया या अभिनेत्रीबद्दल..
राखी सावंत
अगोदर बिगबॉस ची स्पर्धक राहिलेली अभिनेत्री राखी सावंत रोज नव-नवीन कारणांमुळे चर्चेत येत असते. सतत कोणत्या ना कोणत्या वाद विवादात ती पडत असते. तर, राखीने खुलासा केला होता की तीने आई होण्यासाठी तिचे एग्ज फ्रिज करण्याचा निर्णय घेतला होता.
सुकिर्ती कंदपाल
स्टार वन वर प्रसारित होणारी मालिका ‘ प्यार की ये एक कहाणी’ पासून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुकिर्ती कंदपाल देखील या यादीमध्ये सामील आहे. तथापि, भविष्यात सुकिर्ती कधी आई होणार याचा खुलासा तिने अजूनपर्यंत केला नाही आहे.
एकता कपूर
दूरदर्शन राणीला कोण ओळखत नाही. मात्र, तुम्हाला माहित आहे का, की एकता कपूर ने मात्र वयाच्या 36 व्या वर्षीच आपले एग्ज फ्रिज केले होते. प्रत्येक मुलीसारखं एकताला देखील माहित होत की ती कधी ना कधी आई बनेलच आणि तिला यामुळे काही अडचण होऊ नये म्हणून एकताने हे पाऊल उचलले होते.
तनिषा मुखर्जी
बॉलिवुड ची लोकप्रिय अभिनेत्री काजोलची बहीण आणि तनुजा ची मुलगी राणी मुखर्जी देखील या यादीमध्ये सामील आहे. तिने आपल्या वयाच्या 39 व्या वर्षीच तिचे एग्ज फ्रिज केले होते. या गोष्टीचा खुलासा तिने तेव्हा केला होता, जेव्हा एग्ज फ्रिज केल्यानंतर तनिषाला वजन वाढीचा त्रास होत होता.