बॉलीवूड इंडस्ट्रीतील अभिनेत्री अनेकदा त्यांच्या सहकलाकारांसोबत त्यांचे मन शेअर करतात.यापैकी अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी आपल्या को-स्टार किंवा दिग्दर्शकाशी लग्न केले आहे. बाहेरच्या व्यक्तीसोबत पळून गेलेल्या अशा अभिनेत्री चित्रपटसृष्टीत क्वचितच पाहायला मिळतात. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी प्रसिद्ध उद्योगपतींसोबत लग्न केले आहे. साऊथची टॉप अभिनेत्री श्रिया सरनपासून ते काजल अग्रवालपर्यंतच्या नावाचा या यादीत समावेश आहे. आणि लवकरच या यादीत हंसिका मोटवानीचेही नाव जोडले जाणार आहे.
काजल अग्रवाल
साउथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री, काजल अग्रवालने प्रसिद्ध उद्योगपती आणि तिचा दीर्घकाळचा प्रियकर गौतम किचलू याच्यासोबत भव्य लग्न केले. दोघांच्या लग्नाला नुकतीच 2 वर्षे पूर्ण झाली आहेत.
श्रिया सरन
श्रिया सरन ही दक्षिणेतील टॉप अभिनेत्रींमध्ये ओळखली जाते. श्रिया सरनने बिझनेसमन आणि रशियन स्पोर्ट्समन आंद्रेई कोशिव्हला तिचा लाईफ पार्टनर म्हणून निवडले आहे. श्रिया सरनचा हा भव्य विवाह मुंबईत महाराष्ट्रीय रितीरिवाजांनी पार पडला.
प्रियामणी राज
तमिळ चित्रपटांतील अभिनेत्री आणि द फॅमिली मॅनमध्ये सुचीची भूमिका करणारी प्रियामणी राज यांनी दक्षिणेतील प्रसिद्ध उद्योगपती आणि इव्हेंट मॅनेजर मुस्तफा राज यांच्याशी विवाह केला आहे.
श्रुती मेनन
या यादीत साऊथ अभिनेत्री श्रुती मेननच्या नावाचाही समावेश आहे. तिने आपला दीर्घकाळचा प्रियकर आणि उद्योगपती साहिल तिंबडियाला आपला जीवनसाथी बनवले आहे.
रीमा सेन
साऊथ अभिनेत्री रीमा सेनने २०१२ मध्ये बिझनेसमन शिव करण सिंहसोबत लग्न केले. आज दोघांना एक मुलगा आहे त्याचे नाव रुद्र वीर सिंह आहे.
समीरा रेड्डी
अभिनेत्री समीरा रेड्डीने 2014 मध्ये उद्योगपती अक्षय वर्देसोबत लग्न केले. ही अभिनेत्री दोन मुलांची आई असून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.
पद्मप्रिया
पद्मप्रिया ही मल्याळम चित्रपटांची प्रमुख अभिनेत्री आहे. तिने दीर्घकाळ बॉयफ्रेंड आणि उद्योगपती जास्मिन शाहसोबत लग्न केले.
रंभा
अभिनेत्री रंभाने कॅनेडियन आणि तिचा दीर्घकाळचा प्रियकर इंद्रकुमार पद्मनाथनशी लग्न केले. इंद्र कुमार हा श्रीलंकन तमिळ आहे.
हंसिका मोटवानी
या यादीत दाक्षिणात्य अभिनेत्री हंसिका मोटवानीचेही नाव जोडले गेले आहे. हंसिका तिचा बॉयफ्रेंड आणि बिझनेसमन सोहेल कथुरियासोबत ४ डिसेंबरला लग्न केले आहे.