चित्रपट ‘ द कश्मीर फाईल्स ‘ नंतर अभिनेते अनुपम खेर खूपच चर्चेत आहेत. त्यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. अनुपम खेर नेहमी आपल्या घरातील व खाजगी आयुष्याशी संबंधीत गोष्ट सोशल मीडियावर शेयर करत असतात. हल्लीच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांची पत्नी किरण खेर मुलगा सिकंदर खेरच्या मांडीवर बसताना दिसत आहे.
किरण खेरचा हा व्हिडिओ चाहते खूप पसंत करत आहेत. अनुपम खेर यांनी व्हिडिओ शेयर करताना कॅप्शन लिहिले की, ‘आईच्या प्रेमाची लाट…’ या व्हिडिओमध्ये अनुपम खेर आपल्या पत्नीला विचारतात की तू याच्या मांडीवर का बसली आहेस? यावर किरणचे उत्तर खूपच गोड असते. किरण खेर म्हणते की, आयुष्यभर मी त्याला माझ्या मांडीवर बसवले आहे…आता त्याने पण आपल्या आईला कधी कधी आपल्या मांडीवर बसवले पाहिजे.
यानंतर अनुपम खेर आपल्या मुलाला विचारतात की, तुझ्या मांडीवर आई बसली आहे तुला कसे वाटत आहे. यावर सिकंदर खेर म्हणतो की मला खूप छान वाटत आहे. अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या या व्हिडिओला चाहते खूप पसंत करत आहेत. अगदी खूपच वेगाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सगळ्या इंटरनेटवर सध्यातरी याचबद्दल चर्चा सुरू आहे.
अनुपम खेर यांनी काढलेल्या किरण खेर व त्यांच्या मुलाच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर एका चाहत्याने टिप्पणी केली आहे की, किरणजी यांनी आपल्या मनगटावर दोन घड्याळ का बांधल्या आहेत. तसेच दुसऱ्याने लिहिले आहे की, क्या बात है…तुम्ही तुमच्या कुटुंबाचे एवढे चांगले पोस्ट शेयर करतात. या व्यतिरिक्त काही चाहते लव्ह यू आणि किती गोड अशा टिप्पणी देखील करत आहेत.