सोनाक्षी सिन्हा सोबत एक मजेदार प्र्यांक त्यांच्या वॅनिटी वॅन मध्ये केल्या गेला. खरंतर सोनाक्षी सिन्हाला माहीतच नव्हते की तिच्यासोबत मजाक केली जात आहे. यामुळे व्हिडिओच्या शेवटी ती खूप घाबरल्या जाते आणि आरडा ओरडा करू लागते. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
तर, या प्र्यांक मध्ये होते असे की, सोनाक्षी सिन्हा जशी वॅनिटी वॅन मध्ये येते, तसा बाथरूम मधून एक चाहता बाहेर येतो जो सोनाक्षी सिन्हाला म्हणतो की तो तिच्यावर खुप प्रेम करतो आणि त्याला असे वाटते सोनाक्षीने त्याच्याशी लग्न करावे. यावर सोनाक्षी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. तथापि, तो ऐकत नाही.
सोनाक्षी ने नकार दिल्यानंतर तो चाकू बाहेर काढतो आणि आपला गळा कापायची धमकी देतो. सोनाक्षी सिन्हा घाबरून जाते आणि मदतीसाठी लोकांना बोलावू लागते. सोनाक्षी सिन्हा लवकरच द खतरा खतरा कार्यक्रमात दिसणार आहे. या कार्यक्रमाची देखील चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.
सोनाक्षी सिन्हा ने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिचे चित्रपट खूप पसंत केले गेले आहेत. सोनाक्षी सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे. ती नेहमी आपले हॉट आणि बोल्ड फोटोज, व्हिडिओज शेयर करत असते, ज्यामुळे तिचे चाहते देखील खूप उत्साही असतात. ती नेहमी आपल्या चाहत्यांसोबत संवाद देखील साधत असते.