गोलगप्पा खाण्यासाठी बॅकलेस टॉप घालून पब्लिक मध्ये आली पूनम पांडे…

पूनम पांडे ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. यावेळी ती पुन्हा एकदा तिच्या लूकमुळे ट्रोल झाली आहे. पूनम पांडे बॅकलेस टॉप परिधान करून मुंबईत गोलगप्पा खाण्यासाठी पोहोचली आहे, ज्यामुळे ती ट्रोल होत आहे. लोक तिला नौटंकी म्हणत आहेत. तसेच ती असे कपडे घालून गोलगप्पा कसे खात आहे, असा सवालही काही लोकांनी केला आहे. तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पूनम पांडे नेहमीच तिच्या बो’ल्ड आणि हॉ’ट स्टाइलसाठी ओळखली जाते. लॉकअपमध्ये आल्यानंतर पूनम कायम चर्चेत राहिली आहे. यावेळी पूनम पांडे पुन्हा एकदा तिच्या अ‍ॅन्टिक्समुळे मुंबईत स्पॉट झाली आहे. ती गोलगप्पाच्या दुकानात गोलगप्पा खाताना दिसत आहे आणि यावेळी तिने खूप विचित्र कपडे घातले आहेत, यावेळी तिने बॅकलेस व्हाइट टॉप घातला आहे आणि प्रिंटेड बॉडी फिटेड स्कर्ट घातला आहे. तिने केसांमध्ये बन बनवले होते आणि हेवी मेकअप केला होता.

पूनम पांडेचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.मॉडेल पूनम पांडेचा हा स्टाईल पाहून ट्रोलर्स तिला ट्रोल करत आहेत. असे कपडे घालून कोण गोलगप्पा खायला जाते, असे एका यूजरने म्हटले आहे. एका युजरने म्हटले की, “तुम्ही अशा लोकांना कव्हर केले तर चांगल्या लोकांना कोण पाठिंबा देईल” अनेक यूजर्सने तीची खिल्लीही उडवली.

पूनम पांडे तेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आली जेव्हा तिने पती सॅमवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आणि तीच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली. सॅम आणि पूनम पांडे यांचे 2020 मध्ये लग्न झाले होते आणि ते त्यांच्या हनिमूनला गोव्याला गेले होते. नंतर दोघांमध्ये पॅचअपही झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *