एमटीव्हीच्या प्रसिद्ध रिअॅलिटी शो रोडीजची माजी स्पर्धक निहारिका तिवारी सध्या तिच्या पोस्टमुळे चर्चेत आहे. गेडाम येथे राहणाऱ्या निहारिकाने उदयपूरमधील कन्हैयालाल ह’त्या’कां’डावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. तेव्हापासून तीला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या.
निहारिकाने एक व्हिडिओ शेअर करून उदयपूरची घटना सांगितली होती. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये निहारिकाने खु’न खुलेआम होत असल्याचे म्हटले होते. आमच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, हे योग्य आहे का? त्यानंतर निहारिकाला वेगवेगळ्या इन्स्टा अकाउंटवरून सतत धमक्या येत आहेत. निहारिकाच्या समर्थनार्थ अनेक लोक समोर आले आहेत.
छत्तीसगडची रहिवासी निहारिका तिवारी म्हणाली, अशा मुद्द्यांवर खुलेपणाने बोलणारे इंस्टाग्रामवर फार कमी लोक आहेत. उदयपूरमधील घटना निंदनीय होती. मी काही चुकीचे बोलले नाही. मी नुपूर शर्माची बाजू घेतलेली नाही, मी फक्त शिंपी कन्हैयालालची ज्या पद्धतीने ह’त्या झाली त्याला विरोध केला आहे. निहारिका तिवारी ही छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील गिदम येथील रहिवासी आहे. निहारिका सध्या शूटिंगसाठी इंडोनेशियामध्ये आहे.
उदयपूरच्या घटनेनंतर माजी रोडीज निहारिकाला मिळत आहेत धमक्या, घ्या जाणून…
