९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक शिल्पा शेट्टीला तर तुम्ही ओळ्खतच असाल. तिने आपल्या फिल्म करीयरमध्ये एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले. तिचा अभिनय आणि तिच्या सुंदरतेवर लोक आजही फिदा आहेत. पण एवढ असूनही ती आजकाल रियालिटी शो मध्ये बसलेली दिसून येते. आजपण ती आपली फिटनेस आणि योगामूळे चाहत्यांची फेवरेट आहे. नुकताच तिने एका गोष्टीचा खुलासा केला की ज्यामुळे ती ह्या दिवसांत बातम्यांवर झळकली आहे.
सुपरहिट रोमँटिक फिल्म ‘धडकन’ मध्ये शिल्पाच्या अभिनयाची फार प्रशंसा झाली. सिनेमातील सर्व गाणी सुपरहिट झाली. ह्यात शिल्पा ने अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी सोबत काम केले होते. नुकताच शिल्पाने रक इंटरव्ह्यूमध्ये खुलासा केला की तिला करीयरच्या सुरवातीला फार स्ट्रगल करावे लागले. तिला मेकर्स आणि अन्य बऱ्याच लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले.
पण असे असूनही तिने कधी मागे वळून बघितले नाही. शाहरुख खान सोबत ‘बाजीगर’ सिनेमात तिला सगळ्यांच्या आठवणीत बसेल असे पात्र मिळाले. त्यामुळे ती काही दिवसांतच लोकप्रिय झाली. पण हे सगळं असूनही आजपर्यंत तिला एका गोष्टीची उणीव भासते.
शिल्पाने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की धडकन तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सिनेमा होता. पण एका गोष्टीचं तिला नेहमी वाईट वाटतं की तिला ह्या सिनेमासाठी कोणताच अवॉर्ड नाही दिला गेला.
ती पुढे सांगते की ‘त्यावेळी मी ब्लॉन्ड केस केले होते, निळे लेन्स लावले, लाल लिपस्टिक लावायची जे माझ्यावर फार शोभुन दिसायचं. पण एवढं असूनही मला कोणताच अवॉर्ड नाही मिळाला. खास करून मला ‘धडकन’ आणि ‘फिर मिलेंगे’ ह्या सिनेमांसाठी अवॉर्ड मिळायची अपेक्षा होती.