एकेकाळी संपूर्ण बॉलीवूडला आपल्या तालावर नाचवणारा गोविंदा कशामुळे झाला इंडस्ट्रीतुन गायब ? जाणून घ्या कारण

बॉलीवूडचा कॉमेडी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोविंदाने आपल्या अभिनयाच्या आणि नृत्याच्या जोरावर खूप नाव कमावलं. तसा गोविंदा सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह नसतो पण त्यांचे चाहते त्याच्याबद्दल जाणून घेण्यास नेहमीच उत्सुक असतात. गोविंदाने काही दिवसांपूर्वी स्वतः चा यूट्यूब चॅनेल सुरू केला ज्याला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

आज भले गोविंदा सिनेमापासून दूर आहे पण एकेकाळी बॉलीवूडवर त्याचे वर्चस्व होते. त्यामुळे बॉलीवूड च्या बऱ्याच जणांच्या डोळ्यात ते खुपायचं. गोविंदाबद्दल बऱ्याच जणांच्या मनात इर्षा निर्माण झाली. गोविंदाकडे टॅलेंटचा खजिना होता पण फिल्म इंडस्ट्रीतील बड्या कलाकारांना ते आवडत नव्हतं.

गोविंदाने स्वतः ह्या गोष्टीची कबुली दिली आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार गोविंदा बॉलीवूड गँगचे शिकार झाले होते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये गँग आणि वंशावळ हे प्रकार फार जुने आहेत. एकदा शत्रूघन सिन्हाने ह्या गोष्टीचा खुलासा केला होता. त्यांनी एका न्यूज चॅनेल सोबत पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की बॉलीवूड मध्ये खूप वर्षांपासून गँग बनवल्या जात आहेत.

त्यांनी सांगितले की कसे जेव्हा गोविंदाला एका मागे एक सिनेमे मिळत होते हे काही लोकांना पचत नव्हते. गोविंदा चा सिनेमा म्हणजे सुपरहिट असणारच असे मानले जायचे. पण एक वेळ अशी आली की जेव्हा गोविंदा कठीण काळातून जात होते तेव्हा वेळ साधून ह्या लोकांनी त्याला साईडलाईन केले. त्याचे सिनेमे बळकवले जात होते.

शत्रूघन सिन्हाने सांगितलं होतं की एक वेळ होती जेव्हा गोविंदाला ह्या बॉलीवूड गँगने फार त्रास दिला. गोविंदा एक उत्तम कलाकार राहिला आहे आणि परफेक्ट हिरो म्हणून त्याची ओळख आहे. डान्स पासून अभिनयापर्यंत, त्याची कॉमिक टायमिंग कमालीची होती. त्याने स्वतः त्यावर खूप मेहनत घेतली ज्या कारणाने तो परफेक्ट हिरो म्हणून घोषित झाला.

कितीतरी अभिनेते त्याला आपले प्रेरणास्थान मानायचे, त्याची स्टाईल कॉपी करायला बघायचे. गोविंदा स्वतः सुद्धा ही गोष्ट जाणतात की कसे इंडस्ट्रीतील ग्रुपीजमने त्याने करीयर बरबाद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *