दिसायला खूपच भरगच्च आहे डिंपल कपाडियाची नात, तिच्या हॉ’ट’ने’स’समोर….

डिंपल कपाडिया एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. श्रीमंत कुटुंबात वाढलेल्या, लहान वयातच अभिनयाची आकांक्षा बाळगणाऱ्या अभिनेत्री डिंपलला तिच्या वडिलांच्या प्रयत्नांमुळे पहिली संधी मिळाली. तिचा पहिला चित्रपट ‘बॉबी’ रिलीज होणार होता, त्याआधीच तिने बॉलिवूड अभिनेता राजेश खन्नासोबत लग्न केले. डिंपलने राजेश खन्ना यांच्याशी लग्न केले तेव्हा ती 15 वर्षांची होती आणि राजेश खन्ना 30 वर्षांचे होते. लग्नानंतर डिंपलने तिचे फिल्मी करिअर सोडले.

डिंपल आणि राजेश यांना ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या दोन मुली आहेत. ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या दोघांनीही बॉलिवूडमध्ये काम केले आहे. जरी चित्रपट कारकीर्द फार मोठी आणि यशस्वी नव्हती. पण आजही लोक तीला ओळखतात.

ट्विंकल खन्ना ही बॉलिवूड अभिनेता आणि अॅक्शन हिरो अक्षय कुमारची पत्नी आहे. ट्विंकल खन्नाने 1995 मध्ये बरसात या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिच्या विरुद्ध बॉबी देओल होता. तिचा हा चित्रपट खूप हिट ठरला आणि तिला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ट्विंकल खन्नानेही अक्षय कुमारसोबत 2 चित्रपट केले पण ती बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरली. ट्विंकल खन्नाला आरव आणि नितारा ही दोन मुलं आहेत.

रिंकी खन्ना आज जरी चर्चेत नसली तरी लोक त्यांना त्यांच्या चित्रपटांसाठी आठवतात. त्यांनी काही उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1999 मध्ये आलेला ‘प्यार में कभी कभी’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. यानंतर तीने आणखी काही चित्रपट केले. 8 फेब्रुवारी 2003 रोजी समीर सरनशी लग्न केल्यानंतर तिने चित्रपटसृष्टीला अलविदा केला. लग्नानंतर रिंकी लंडनला स्थायिक झाली. 2004 मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला जिचे नाव तिने नाविका ठेवले.

नाविका खूप सुंदर दिसते. तीचे डोळे तीचा चुलत भाऊ आणि ट्विंकल खन्ना यांचा मुलगा आरव याच्या डोळ्यांसारखे असल्याचे तीच्या छायाचित्रांमध्ये दिसत आहे. नाविकाच्या चित्रांमध्ये ती हुबेहुब तिच्या आईसारखी दिसते आणि तिच्यात राजेश खन्ना यांची प्रतिमा दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *