दिलफेक अजयचे झाले देशप्रेमी अजयमध्ये रूपांतर! आधी अभिनेत्रींवर तर आता, देशभक्तीच्या प्रेमात अजय..

अभिनेता अजय देवगण म्हणजेच विशाल देवगण आज म्हणजेच दोन एप्रिल रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या जन्म 2 एप्रिल 1969 रोजी पंजाब मध्ये झाला होता. अजयने मात्र वयाच्या 22 व्या वर्षीच बॉलिवूड मधे पदार्पण केले होते आणि मुख्य भूमिकेत ‘फूल औंर काटे’ त्याचा पहिला चित्रपट होता.

अजयने आपल्या कारकीर्दीत गंभीर भूमिकांपासून ते विनोदी भूमिकांपर्यंत सगळ्या प्रकारचे पात्र साकारले आहे आणि आज आपल्या दमदार अभिनयावर अजय हिंदी चित्रपसृष्टीतील एक मोठे नाव झाले आहे. याव्यतिरिक्त अजयला दोनदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित देखील केले आहे. अजय देवगनच्या चित्रपट निवडण्याबद्दल बोलायचे झाले तर ते आधीपेक्षा चित्रपट खूपच निवडकपणे घेतात.

अजय देवगणने सन 1991 मध्ये चित्रपट ‘ फूल औंर काटे ‘ पासून मुख्य अभिनेता म्हणून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर त्याने अनेक चित्रपट केले. जसे की, जिनमें जिगर, एक ही रिश्ता, दिव्य शक्ती, प्लॅटफॉर्म, संग्राम, दिल है बेताब, बेदर्दी, धनवान, दिलवाले, कानुन, विजयपथ, सुहाग, नाजायज, हलचल, गुंडाराज, हकीकत, इश्क, होगी प्यार की जीत असे अनेक चित्रपट सामील आहेत.

आधी अजय देवगणचे चित्रपट प्रेम आणि रहस्य असे असायचे. यानंतर अजय विनोदी चित्रपटांकडे वळाला, जसे की गोलमाल, गोलमाल रिटर्न्स. जर आताचे चित्रपट बघायला गेले तर या चित्रपटात देशभक्ती दिसत आहे आणि इतिहास दाखवणाऱ्या गोष्टी दिसत आहेत. हल्लीच अजयचा चित्रपट तानाजी आला होता. जो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विश्वासू पात्र सैनिक तानाजीवर आधारित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *