धक्कादायक सत्य समोर..! आलियाचे अगोदर देखील झाले आहे लग्न? आई सोनी राजदान देणार दुसऱ्यांदा अभिनेत्रीला निरोप..

रणबीर कपूर आणि आलिया आज लग्न करत आहेत. मात्र काही वेळातच आलिया भट्ट रणबीर कपूरची अर्धांगिनी म्हणून दिसेल. तेव्हा ती मिस भट्ट पासून ते कपूर कुटुंबाची सून बनून जाईल. चाहते देखील या क्षणाची खूप वाट बघत होते. आज शेवटी त्यांची देखील प्रतिक्षेची वाट संपणार आहे. अनेक बॉलिवुड कलाकार या निमित्ताने जोडप्याला शुभेच्छा देत आहेत. मात्र हे पहिल्यांदाच होत नाहीये की आलियाची विदाई होत आहे.

याअगोदर देखील एकदा आलियाची विदाई झाली आहे आणि ती आपल्या सासरी गेली आहे. काय झालं? ही गोष्ट ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकित झालात ना? मात्र, जरा थांबा, जास्त गोंधळात पडू नका कारण या अगोदर आलिया चित्रपटात वधू बनून सासरी गेली आहे. मात्र यावेळेस ती खऱ्या आयुष्यात वधू बनत आहे. आज खऱ्या आयुष्यात सोनी राजदान आपल्या मुलीला निरोप देतील.

याअगोदर रील आयुष्यात सोनी राजदान यांनी आलियाला विदा केले होते. आता तुम्ही हे देखील जाणून घ्या की नेमका तो कोणता चित्रपट होता, ज्यामधे सोनी राजदान यांनी आलियाला विदा केले होते. खरंतर, आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो चित्रपट आहे ‘राजी’. राजी चित्रपटात आलिया सहमत आणि सोनी राजदान तिची आई तेजी खानच्या भूमिकेत होती.

ही तर होती आलियाची रील आयुष्यातील विदाई, काल रणबीर आणि आलिया यांच्या मेहंदी कार्यक्रमाचे आयोजन होते. यामध्ये पूर्ण भट्ट कुटुंब आणि कपूर कुटुंब सामील झाले होते. या दोन्ही कुटुंबाऐवजी बॉलिवूड मधील अनेक कलाकार देखील सामील झाले होते. दोघांच्याही लग्नात बंदोबस्त हा कडक राहणार आहे. आता सर्वांनाच त्यांच्या लग्नाच्या फोटोची उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *