एकेकाळी या अभिनेत्रींचे नाव क्रिकेटर सचिन तेंडुलकरसोबत जोडले गेले होते, दोघेही करणार होते लग्न….

९० च्या दशकातील बो’ल्ड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर तिचा ५३ वा वाढदिवस साजरा केला आहे. 20 नोव्हेंबर 1969 रोजी जन्मलेल्या शिल्पा शिरोडकरने अभिनयात जेवढी मेहनत घेतली तेवढी अभ्यासात केली नाही हे विशेष एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने तिच्या अभ्यासाविषयी सांगितले आणि म्हणाली, ‘मी 10वीत नापास झाले, पण मला कोणतीही खंत किंवा लाज नाही. मी सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप कमकुवत होते, त्यामुळे अभिनयात आले हे चांगलेच झाले.

शिल्पा शिरोडकरने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी तिच्या करिअरला सुरुवात केली होती. अभिनेत्रीने 1989 मध्ये ‘भ्रष्टाचार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तर त्याच वर्षी तिने ‘किशन कन्हैया’ चित्रपटात तिच्या बो’ल्ड सीनने धुमाकूळ घातला. शिल्पा शिरोडकर यांना अभिनयाचा वारसा तीच्या कुटुंबाकडून मिळाला आहे. तिची आई गंगूबाई एक प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री होती, तर तिची आजी मीनाक्षी शिरोडकर देखील अभिनेत्री होती.

शिल्पा शिरोडकरने आपल्या १० वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अमिताभ बच्चन, गोविंदा, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि मिथुन चक्रवर्ती यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. तिच्या करिअरच्या सुरुवातीलाच ती तिच्या बो’ल्ड’नेसने प्रसिद्धीच्या झोतात आली होती. शिल्पा शिरोडकरने मुख्यतः अभिनेता मिथुन चक्रवर्तीसोबत काम केले आहे. शिल्पा शिरोडकरच्या हिट चित्रपटांमध्ये ‘हम’, ‘दिल ही तो है’, ‘आँखे’, ‘खुदा गवाह’ आणि ‘गोपी-किशन’ यांचा समावेश आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, 1994 मध्ये शिल्पा शिरोडकर आणि सचिन तेंडुलकरच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीचे नाव एकेकाळी क्रिकेटर सचिन तेंडुलकरसोबत जोडले गेले होते. महाराष्ट्रीयन कुटुंबातील असल्याने दोघेही लवकरच लग्न करणार होते. पण हे नाते पुढे जाण्याआधीच एका मुलाखतीदरम्यान सचिन तेंडुलकरने ही बातमी खोटी ठरवत शिल्पा शिरोडकरला ओळखत नसल्याचे सांगितले. शिल्पा शिरोडकरने एका मुलाखतीदरम्यानही ही बातमी अफवा असल्याचे म्हटले होते.

त्यानंतर अभिनेत्रीने 2000 मध्ये बँकर अपरेश रंजीतसोबत लग्न केले. शिल्पा शिरोडकर लग्नानंतर बराच काळ अभिनय जगतापासून दूर राहिली. मात्र, 2013 मध्ये 13 वर्षांनंतर तीने री-एंट्री केली आणि 2016 मध्ये सिलसिला प्यार का या टीव्ही शोमध्ये काम केले. यावेळी तीने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. टीव्ही जगतात प्रवेश केल्यानंतर शिल्पा शिरोडकर ‘एक मुठ्ठी आसमान’, ‘सिलसिला प्यार का’, ‘सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल’, ‘रिच फॉर द स्टार्स’ आणि ‘मेरे दिल की लाइफलाइन’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *