अंकिता लोखंडेचे लग्न जेव्हापासून विकी जैन सोबत झाले आहे, अंकिता सोशल मीडियावर खूपच रोमँटिक व्हिडिओ करत आहे. अंकिता ने इंस्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यामधे ती नववधू सारखी दिसत आहे. तिने सिंदुर आणि टिकली लावली आहे आणि गळ्यात मंगळसूत्र घातल आहे.
या व्हिडिओ मध्ये ती पोज देताना दिसत आहे आणि तिने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, मला कोणतेच कॅप्शन आता सुचत नाही आहे, मला असे वाटत आहे की हे गाणं बरच काही सांगत आहे. व्हिडिओ च्या गाणं चालू आहे, आपके प्यार मैं हम सवरणे लगे…अंकिता आपल्या चाहत्यांसाठी नेहमी नवीन पोस्ट शेयर करत असते.
हल्लीच ती होळीच्या एका पार्टीमध्ये पती विकी जैनवर राग करताना दिसली होती. मात्र, नंतर अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओ मध्ये विकी जैन सांगताना दिसत आहे की नेमक का ते आणि अंकिता दोघेही ‘मेड फॉर इच ऑदर’ जोडी आहे.
या दिवसात अंकिता लोखंडे आणि विकी जैन स्टार प्लस वाहिनीवरील नवीन कार्यक्रम ‘स्मार्ट जोडी’ मध्ये दिसले जात आहे. या कार्यक्रमाच्या सेट वरून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामधे ते शो चा थीम ‘मेड फॉर इच ऑदर’ वर बोलताना दिसत आहेत. व्हिडिओ मध्ये विकी सांगत आहे की नेमक का विकी आणि अंकिता ची जोडी एकमेकांसाठी का बनली आहे.