चक्क टॉयलेटच्या मग मध्ये सलमान खानला प्यायला लागला चहा ! वाचा सविस्तर

बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान हा देशभरात फार लोकप्रिय आहे. सलमानचा स्टारडम असा आहे की जगभरात त्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा होतो. आपला बिनधास्त अंदाज आणि उत्कृष्ट शरीरयष्टी ह्यासाठी तो तरुणाईमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. सध्या सलमान बिग बॉस द्वारे सगळ्यांचे मनोरंजन करत आहे आणि ह्या वर्षी त्याचे दोन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत अशी बातमी आहे.

एक काळ असा होता जेव्हा सलमानवर संकटांचं आभाळ कोसळले होते. १९८८ मध्ये काळवीट शिकार प्रकरणी सलमानला कोर्टाने ५ वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली होती. जेलमध्ये सलमानला खूप कठीण काळातून जावे लागले.

फिल्म हम साथ साथ है च्या चित्रीकरणादरम्यान सलमानने काळवीटची शिकार केली होती. त्यासाठी त्याला ५ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून बाहेर आल्यावर इंडिया टुडे ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की त्याचे काय हाल झाले होते. सलमानने तुरुंगातील काही अशा गोष्टी सांगितल्या ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

सलमानने सांगितले की जेल मध्ये राहणे फार कठीण होते. मुख्यतः मला बाथरूमला जाण्याचं जास्त टेन्शन यायचं. एका खोलीत ९ ते १० जण राहायचे आणि एकच बाथरूम आणि टॉयलेट होते. ज्या मग मध्ये डाळ खायचो, चहा प्यायचो तोच मग टॉयलेट आणि अंघोळीसाठी वापरायचो.

सलमान असे पण सांगतो की तो एकाच मगाने सगळी कामं करायचा. ह्या गोष्टीचा उल्लेख त्याने बिग बॉसच्या एका शो मध्ये सुद्धा केला होता. जेव्हा शो मध्ये जेल बनवलं जातं तेव्हा तो त्याचे जुने दिवस आठवून ह्या आठवणी सांगत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *