हिंदी सिनेमा जगतचा दिग्गज अभिनेता राजेश खन्ना आजपण लोकांच्या हृदयात घर करून आहेत. ७० च्या दशकात राजेश खन्नासाठी जे प्रेम लोकांच्या मनात होतं त्याचे वर्णन कोणी करू शकत नाही. राजेश खन्ना ‘काका’ ह्या नावाने लोक ओळखायचे. राजेश खन्नाच्या जीवनाशी निगडित काही किस्से आहेत जे फार फेमस आहेत , ज्यात त्यांचे प्रेमप्रकरण तर जगजाहीर आहे.
देखण्या राजेश खन्नावर लहानपणापासून बऱ्याच मुली फिदा होत्या. असे म्हंटले जाते की त्या काळी मुली राजेश खन्नाचा फोटो उशीखाली ठेवून झोपायच्या. पण काकांचा जीव एकाच मुलीवर जडला होता आणि ती होती अंजु महेंद्रु. काका अंजूवर फार प्रेम करायचे.
दोघे एकत्र वाढले आणि एकत्रच शिक्षण घेतले. बघता बघता दोघांची मैत्री प्रेमात बदलली ज्यानंतर ते दोघे लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहू लागले. पण वेळेनुसार त्यांच्यात कलह वाढू लागले आणि दोघे वेगळे झाले.
असे पण म्हंटले जाते की राजेश खन्ना जेव्हा बॉलीवूड मध्ये आले होते तेव्हा काम मिळवण्यासाठी त्यांनी फार स्ट्रगल केले. तेच दुसऱ्या बाजूला अंजु मॉडलिंग करत होती आणि बॉलीवूड मध्ये काम मिळवण्यासाठी हातपाय मारत होती. जेव्हा राजेश खन्नाला यश मिळाले, तेव्हा अंजुसाठी त्याचे वागणे बदलू लागले. राजेश खन्नाला नेहमी त्यांची स्तुती ऐकायला आवडायचं. त्यामुळेच ते नेहमी अशा लोकांसोबत राहायचे जे त्यांची स्तुती करत.
अंजु सोबत ब्रेकअप झाल्यावर राजेश खन्नाचा जीव १६ वर्षाच्या लहान मुलीवर जडला. ज्या वेळी राजेशने डिंपल सोबत लग्न केले तेव्हा ती फार लहान होती आणि तिने फिल्म बॉबी ने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. असेपण म्हंटले जाते की राजेश आणि डिंपल चे लग्न झाले तेव्हा काकाने मुद्दाम आपली वरात अंजुला जळवण्यासाठी तिच्या घरासमोरून नेली.