बॉलिवुड अभिनेत्री करीना कपूर आणि तिच्या मुलींची गँग अनेकदा एकत्र पार्टी करताना दिसतात. आता या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. बॉलिवुड मधील ही पार्टी कमालीची वेगळी ठरली आहे. कारण या पार्टीची चर्चा प्रत्येकजण एका वेगळ्याच कारणामुळे करत आहे.
या पार्टीचे कारण देखील तेवढेच वेगळे आहे ते कारण म्हणजे या पार्टीमध्ये मलायका अरोरा उपस्थित नव्हती. मलायका अरोराचा नुकताच अपघात झाला होता. त्यानंतर ती आराम करत आहे. या पार्टीमध्ये करीना कपूरने अनेक ग्लॅमरस फोटोज काढून पार्टीमध्ये चार चांद लावले.
या फोटोमध्ये बॉलिवुड ची बेबो म्हणजेच करीना कपूर हीने काळया रंगाच्या ड्रेस घातला आहे. हा तिचा आवडता रंग आहे. सध्या तिचे हे फोटोज सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. पार्टीच्या काही फोटोंमध्ये करीना कपूर आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा एकत्र दिसत आहे.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि करण जोहर करीनाच्या पार्टीच्या छायाचित्रात एकत्र दिसत आहेत. तिच्या या फोटोची सध्या खूपच जोरदारपणे चर्चा सुरू आहे. पार्टीच्या या फोटोंमध्ये करिश्मा कपूर आणि मनीष मल्होत्रा गोड पोज देताना दिसत आहेत. या पार्टीमध्ये अभिनेत्री मलायका अरोरा सोडून बाकी सर्व कलाकार आले आहेत आणि त्या सर्वांना तिची आठवण येत आहे.