बॉलिवूडच्या ‘ह्या’ अभिनेत्याचं एका चुकीमुळे झालं करिअर बरबाद.. ऐश्वर्या रायला केलं होतं किस..

बॉलिवूड अभिनेता चंद्रचूड सिंह, ज्यांनी अनेक चित्रपट केले पण त्यांना अपेक्षित स्थान प्राप्त झाले नाही. त्याने बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे आणि उत्तम चित्रपटही केले आहेत. 11 ऑक्टोबर रोजी चंद्रचूड सिंह यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांच्याशी संबंधित खास गोष्टींबद्दल सांगत आहोत.

चंद्रचूड सिंह यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1968 रोजी झाला होता. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. अमिताभ बच्चन या चित्रपटाचे निर्माता होते. हा चित्रपट सन 1996 मध्ये प्रदर्शित झाला होता. चंद्रचूड सिंगचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर तो अभिनेत्री तब्बूसमवेत माचीस या चित्रपटात दिसला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची पडद्यावर चांगली छाप पडली होती.

यानंतर चंद्रचूड सिंह डाग: द फायर, जोश आणि क्या कहना यासह बॉलिवूडच्या बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसला. जोश या चित्रपटात तर त्याने चक्क सह अभिनेत्री ऐश्वर्या रायला किस केलं होतं. काही हिट चित्रपट दिल्यानंतर चंद्रचूड सिंगने स्वतःला बॉलिवूडपासून दूर केले. एका मुलाखतीत त्यांनी चित्रपटांपासून दूर जाण्याचे कारणही स्पष्ट केले. तो म्हणाला होता, ‘मला काही चांगल्या रोल करायच्या होत्या. माझ्याकडे अनेक ऑफर आल्या पण मी वेगळ्या भूमिकेची वाट पाहत होतो. तो आला नाही त्यामुळे मी चित्रपटांपासून दूर राहिलो.

डझनभर चित्रपट करून चंद्रचूड सिंह अचानक बॉलिवूडमधून गायब झाला. त्याने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले. 2000 मध्ये चंद्रचूडला एक भीषण अपघात झाला. तो गोव्यात नावेत बसला होता. मग हा अपघात झाला आणि त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर चंद्रचूडची कारकीर्द ठप्प झाली. या अपघातातून सावरण्यासाठी चंद्रचूडला सुमारे 10 वर्षे लागली. ‘चार दिन की चांदनी’ चित्रपटाद्वारे त्याने पुनरागमन केले. पण हा चित्रपट फ्लॉप झाला.चंद्रचूड शास्त्रीय संगीत देखील शिकला आहे.

एका मुलाखतीत चंद्रचूड यांनी असे म्हटले होते की अपघातानंतर त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या, परंतु पत्नी आणि मुलाने त्यांचे खूप समर्थन केले. चंद्रचूड सिंह यावर्षी आर्य या वेब सीरिजमध्ये दिसला होता. या वेब सीरिजमधील त्याच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला. आर्य या वेब सीरिजवरून चंद्रचूड सिंहच नव्हे तर अभिनेत्री सुष्मिता सेननेही अभिनयाच्या जगात पुनरागमन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *