बर्थडे स्पेशल : एकेकाळी कुरूप दिसते म्हणून या अभिनेत्रीला केले गेले होते कलंकित, आज आहे करोडोंची मालकीण

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिचा आज ४२ वा वाढदिवस आहे. १ जानेवारी १९७९ ला विद्या बालनचा जन्म मुंबईतील एका दक्षिण भारतीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच बॉलीवूडमध्ये जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून विद्या बालनने कमी वयातच इंडस्ट्रीत पदार्पण केले. सातवीत असताना विद्याने माधुरी दिक्षितच्या ‘ तेजाब ‘ ह्या सिनेमातील २-३ गाण्यांवर नाच केला.

तेव्हापासून विद्या बालनने अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहण्यास सुरवात केली.बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक अशी विद्या बालन ही आज आपल्या यशस्वी करीयर , भरपूर संपत्ती आणि इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. परंतु बॉलीवूड मध्ये इथपर्यंत पोहोचण्यासाठी विद्या बालनला खूप खडतर प्रवास करावा लागला.

विद्या बालन झी टीव्हीच्या कॉमेडी शो ‘हम पांच’ मध्ये राधिका माथूरच्या भूमिकेत दिसली पण ह्यातून तिला जास्त ओळख निर्माण करता आली नाही. विद्या बालनला सुरवातीच्या काळात इंडस्ट्रीतील लोक मनहूस समजत होते त्यामुळे तिला काम मिळणे बंद झाले होते. ह्या दरम्यानच तिला ‘परिणीता’ हा चित्रपट मिळाला त्यानंतर तिचे जीवनच पलटले.

विद्या बालन एका मुलाखतीत आपल्या संघर्षाबद्दल सांगताना असं म्हणते की , ” सुरवातीच्या काळात मी जेव्हा स्ट्रगल करत होती तेव्हा मला दक्षिण भारतीय इंडस्ट्रीचे मोठे अभिनेते मोहनलाल सोबत मल्याळम सिनेमा मिळाला होता पण काही कारणास्तव तो सिनेमा बंद पडला आणि तेव्हा मला मनहूस म्हणून कलंकित केले गेले. त्यादरम्यानच एक दक्षिण भारतीय सिनेमाच्या कास्टिंगच्या वेळी माझ्या जन्माची वेळ मागण्यात आली होती.

विद्या बालनने भरपूर जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे. २००३ साली विद्या बालनने बंगाली चित्रपट ‘ भालो थेको ‘ मध्ये मुख्य भूमिका साकारली होती.२००५ साली ‘परिणिता’ ह्या चित्रपटाने विद्या बालनचे आयुष्य बदलून टाकले. आपल्या १३ वर्षाच्या कारकिर्दीत विद्याने बॉलीवूडमध्ये आपली पकड मजबूत केली. ‘भूलभुलैया’ पासून ‘द डर्टी पिक्चर’ मधील बोल्ड भूमिकेपर्यंत , किंवा ‘कहानी’ ची दमदार अदाकार पर्यंत विद्याने आपल्या प्रत्येक अभिनयाने सगळ्यांना प्रभावित केले.

विद्याने नॅशनल अवॉर्ड सोबतच अनेक छोटे मोठे अवॉर्ड आपल्या नावे केली आहेत. २०१७ मध्ये आलेल्या ‘तुम्हारी सुलू’ ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सध्याच्या दिवसात विद्या बऱ्याच दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. २०१२ साली विद्याने चित्रपट निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर सोबत विवाह केला आणि मीडियाच्या म्हणण्यानुसार आज विद्या बालन जवळपास १८८ कोटींची मालकीण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *