विनोदवीर म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी लवकरच लहान बाळाचा आवाज येणार आहे. गरोदरपणा दरम्यान देखील भारती सिंह खूप सक्रिय आहे आणि निरंतर चित्रीकरण करत आहे. याच दरम्यान हल्लीच सोशल मीडियावर अश्या बातम्या व्हायरल होत आहेत की भारती सिंह ने लहान मुलीला जन्म दिला आहे आणि थोड्याच वेळात ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली.
याप्रकारची बातमी व्हायरल झाल्यानंतर भारती सिंह ने ही मात्र एक अफवा आहे असे सांगितले आणि सत्य काय आहे ते सांगितले. भारती सिंह सोशल मीडिया लाईव्हला म्हणाली की, ‘मला माझ्या चाहत्यांकडून कॉल व मेसेज येत आहेत, जे माझे अभिनंदन करत आहेत. अशी बातमी पसरत आहे की मी एका मुलीला जन्म दिला आहे, मात्र हे खरं नाही आहे. मी ‘खत्रा खत्रा’ च्या सेटवर आहे. काही वेळ ब्रेक होता तर मला वाटलं की इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन सत्य सांगावे.’
भारती पुढे म्हणाली की, ‘मला भीती वाटत आहे, माझ्या प्रसुतीची तारीख जवळ येत आहे.’ आम्ही तुम्हाला आठवण करून देतो की याअगोदर भारतीने सांगितले होते की ती कधीपर्यंत बाळाला जन्म देऊ शकते. एक व्हिडिओ देखील इंस्टाग्रामवर व्हायरल झाला होता त्यात ढोल वाजण्याचा आवाज येत असतो, आणि बोलण्यात समजते की कोणाच्या तरी लग्नाचा बँड आहे. या बँडवर भारती थोडी नाचताना दिसते. मग कोणीतरी विचारते की गोड बातमी कधी मिळू शकते. ज्यावर भारती म्हणते की, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात.
तसेच एका मुलाखतीत भारतीने सांगितले होते की दीड महिन्यांपर्यंत तीला गरोदरपणाबद्दल माहिती झाले नव्हते. पिंकवीला सोबत बोलताना भारती ने सांगितले होते की, जेव्हा मी गरोदर झाले होते तेव्हा दीड महिन्यांपर्यंत मला समजलेच नव्हते की मी गरोदर आहे. जाड लोकांचं लवकर समजत नाही. मी खात आहे, चित्रीकरण करत आहे, पळत आहे, डान्स दिवाणे मधे मी नाचत आहे. तेव्हा मला वाटले की मी एकदा चाचणी केली पाहिजे. जेव्हा मी चाचणी केली तेव्हा मला समजले की मी गरोदर आहे.