बिग बॉसनंतर अनूप जलोटा आणि जसलीन मथारू खूप चर्चेत आले होते. मिळालेल्या माहितीनुसार वयाच्या 70व्या वर्षी भजनसम्राट अनुप जलोटा पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहेत. अनूप जलोटा आणि जसलीन मथारू नेहमीच चर्चेत असतात.
दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. जसलीन मथारू हिने ‘बिग बॉस 12’ मध्ये प्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांची गर्लफ्रेंड म्हणून एन्ट्री केली होती. या दोघांपैकी कोणीच शेवटपर्यंत पोहोचू शकलं नाही. मात्र घराबाहेर आल्यानंतर दोघे आपल्या नात्याबद्दल कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते दोघे चर्चेत आहेत.
अनूप जलोटा आणि जसलीन मथारू यांचे काही फोटो सध्या चर्चेत आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. या फोटोमध्ये अनूप जलोटा यांनी डोक्यावर सेहरा (मुंडावळ्या) घातल्या आहेत. सोबतच सलीन मथारू नवरीच्या वेशात दिसत आहे. यादरम्यान दोघेही खूप आनंदात दिसत आहेत.
जसलीन मथारूने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअऱ केले आहेत. मात्र त्यांनी या फोटोला कोणतेही कॅप्शन दिलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार अनूप जलोटा आणि जसलीन मथारू लवकरच एकत्र एका चित्रपटात दिसून येणार आहेत.
जसलीन मथारू हिने 11 व्या वर्षापासून शास्त्रीय आणि पश्चिमी संगीत शिकवणं सुरू केलं आणि 16 व्या वर्षात त्यांनी इंटर कॉलेज गायन प्रतियोगितेत सर्वश्रेष्ठ महिला गायिकेचा पुरस्कार पटाकवला. बिग बॉस 12 मध्ये अनूप जलोटा यांच्यासोबत जोडीमध्ये दिसल्यानंतर जसलीन मथारू चर्चेत आली होती.
दोघांच्या मैत्रीबाबत अनेक सवाल उपस्थित करण्यात आले आहे. केवळ शोसाठी जोडी होऊन आल्याचे अनूप जलोटा यांनी सांगितले होते.