ज्योतिष शास्त्र, वास्तू शास्त्र, सामुद्रिक शास्त्र असे बरेच शास्त्र आहेत ज्यातील प्रयोग केल्याने जीवनात येणारी संकटे दूर होऊ शकतात. त्रास झाल्यावर लोक ह्या शास्त्रीय उपायांचा उपयोग करतात, पण आज आम्ही काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या गोष्टींबद्दल वाचल्यानंतर आपण त्या करताना हजार वेळा विचार कराल. ह्या चुका केल्यास घरातील नात्यांवर त्याचा वाईट प्रभाव पडतो.
पती-पत्नीचं नातं हे जगातील सगळ्यात मोठं नातं आहे जर विश्वास, प्रेम, दोस्ती आणि स्नेह ह्यापासून बनलेलं असतं. ह्या नात्याची खास गोष्ट म्हणजे जर पती पत्नी एक दुसऱ्यावर खूप प्रेम करतात तर ते जीवनात यशाकडे वाटचाल करतात. पती पत्नीत प्रेम तर असतंच पण सोबतच ते चांगले मित्रही असावे लागतात जे निस्वार्थीपणाने एकमेकांना साथ देतात आणि संकटाच्या वेळी एकत्र सामोरे जातात. पण कधी कधी काही चुकांमुळे नात्यात दुरावा निर्माण होतो तर काय आहेत त्या चुका जाणून घेऊया.
१) बरेच लोक आपल्या बेडरूमध्ये वॉश बेसिन लावतात. वास्तुशास्त्र नुसार त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि एकमेकांवरील विश्वास कमी होतो आणि एकमेकांवर संशय घेण्यास सुरुवात होते. त्यामुळे क्षयन कक्षेत वॉश बेसिन नसावे.
२) पाहुण्यांना आणि मित्रांना अतिथी रूम किंवा जेवणाच्या रूममध्येच बसवावे. आपल्या बेडरूममध्ये प्रत्येकाला नाही नेलं पाहिजे. वास्तू विज्ञान नुसार ह्यामुळे बेडरूम मध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि नात्यात दुरावे निर्माण होतात.
३) बेडरूम मध्ये आरसा नसावा, आरसा लावणे महत्वाचे असेल तर असा लावावा की झोपल्यावर तुमचा चेहरा दिसायला नको. बिछान्यासमोर आरसा लावल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि उत्साहात कमतरता राहते.
४) बेडरूम मध्ये कोणत्याही झाडाची कुंडी नसावी. त्यामुळे त्याचा वाईट प्रभाव आपल्या घरावर पडतो. जर कुंडी असेल तर त्यात कृत्रिम फुले असावी. जिवंत झाडाची कुंडी ठेवू नये.