कित्येक वर्षांपूर्वीच्या टीव्हीवरील जाहिरातीमधे, ‘बंटीला’ हँडवॉशचे स्पष्टीकरण देणारी क्यूट मुलगी आठवत असेल, आजही लोक ‘बंटी तेरा साबण स्लो है क्या?’ ही ओळ बोलताना वापरतात. हा संवाद बोलणारी क्यूट मुलगी आता एक बोल्ड इंटरनेट सेंशन आणि टीव्ही अभिनेत्री बनली आहे. होय! आम्ही बोलत आहोत अभिनेत्री अवनीत कौर बद्दल, जी क्यूटनेस नंतर आता तिच्या हॉटनेस मुळे चर्चेत आली आहे.
लहानपणी अतिशय क्यूट आणि सुंदर दिसणारी अवनीत कौर आता इंटरनेट सेंशन बनली आहे. तीचे हे लेटेस्ट फोटो खूप व्हायरल होत आहेत. तिने या चित्रांमध्ये आतापर्यंतची सर्वात बोल्ड शैली दाखवली आहे. अवनीतच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर ती एक अभिनेत्री, मॉडेल आणि डान्सर आहे. अवनीत टीव्ही शो ‘अलादीन – नाम तो सुना होगा’ मध्ये राजकुमारी यास्मीनच्या भूमिकेत दिसली आहे.
अवनीत कौरने आपल्या करिअरची सुरुवात ‘डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर्स’ने केली. यासोबतच ती लहानपणी अनेक मालिकांमध्येही दिसली आहे. अवनीत कौरला राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ आणि ‘मर्दानी 2’ या चित्रपटांमध्येही खूप प्रशंसा मिळाली आहे. या चित्रपटात ती मीराच्या भूमिकेत दिसली होती. अवनीत कौरने वयाच्या 10 व्या वर्षी करिअरला सुरुवात केली. आता ती 20 वर्षांची झाली आहे.