सैराट चित्रपटातून रसिकांच्या मनात अल्पावधीत अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने घर केले. त्यानंतर ती आणखी मराठी चित्रपटात आणि हिंदी वेबसीरिजमध्ये पाहायला मिळाली. तसेच रिंकू राजगुरू ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. दरम्यान ती पुन्हा एकदा फोटोंमुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिने साडीतील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते तिला तुझे लग्न ठरले का असे विचारताना दिसत आहेत.
नागराज मंजुळे यांचे ग्रामीण धाटणीचे चित्रपट अधिक आहेत. त्या वेळेस त्यांना ग्रामीण भागातच चेहरा पाहिजे होता. त्यामुळे त्यांनी अनेक तरुण अभिनेत्री पाहिल्या. मात्र, त्यांना कोणाचाही चेहरा पसंत पडत नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणीची निवड या चित्रपटासाठी केली.
तिची ऑडिशन घेतली. नागराज मंजुळेंना ती मुलगी आवडली. तिचे नाव रिंकू राजगुरु असे होते. सैराट चित्रपट आला होता, त्यावेळेस रिंकू राजगुरुची दहावी देखील झाली नव्हती. चित्रपट झाल्यानंतर तिने दहावीची परीक्षा दिली होती. हा चित्रपट एवढा गाजला की, मराठीमध्ये या चित्रपटाने पहिल्यांदाच शंभर कोटींचा व्यवसाय केला.
नुकतेच रिंकूने सोशल मिडीयावर शेयर केलेले फोटो लक्षवेधी ठरले आहेत. रिंकूने तान्ह्या बाळासोबतचे गोंडस फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेयर केले आहेत.
रिंकूच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय. रिंकू अधूनमधून तिच्या अकाउंटवर तिच्याविषयीच्या लेटेस्ट अपडेट टाकताना दिसते. कधी रिंकूचे साडीतले सुंदर फोटो तर कधी मांजरींसोबतचे व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यामुळे रिंकू तिच्या चाहत्यांसोबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून जोडली गेली आहे.