अमिताभ यांना ‘सर जी’ म्हटलं नाही म्हणून ‘या’ अभिनेत्याला गमवावा लागला होता सिनेमा..

कादर खान यांना फक्त उत्कृष्ट अभिनेता म्हणूनच नाही तर लेखक, दिग्दर्शक, संवाद लेखन, पटकथाकार म्हणून ओळखलं जातं. सुरुवातीच्या दिवसांमध्ये कादर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यात मैत्रीपूर्व संबंध होते.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं नाव येतं. ३१ डिसेंबर २०१८ रोजी प्रदीर्घ आ-जा-रा-ने कॅनडामध्ये त्यांचं नि-ध-न झालं. अनेक वर्ष ते आ-जा-री होते. वेगवेळ्या प्रकारच्या व्या-धीं-चा त्यांनी बरीच वर्ष लढा दिला. पण अखेर वृ-द्धा-प-का-ळा-मुळे त्यांची प्रा-ण-ज्यो-त मालवली.

कादर खान आणि अमिताभ बच्चन यांनी कुली, अमर अकबर अँथनी, शराबी, लावारिस आणि मुकद्दार का सिकंदर यासह अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. पण एका सिनेमात अमिताभ बच्चन यांना ‘सर जी’ म्हणण्यास नकार दिल्याने त्यांना एका सिनेमातून काढूनही टाकण्यात आलं होतं. स्वतः खान यांनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.

कादर खान म्हणाले होते की, ‘मी अमिताभला अमित म्हणायचो. एक दिवस दक्षिणेतील एका निर्मात्याने मला विचारलं की मी सर जी यांना भेटलो का? त्यांच्या या प्रश्नावर मी प्रतिप्रश्न करत म्हटलं कोण सर? यानंतर त्याने अमितकडे इशारा केला. मी म्हणालो तो तर अमित आहे. तो सर कधी झाला. यावर निर्मात्याने ते त्याला सर जी अशी हाक मारतात असं म्हटलं. यानंतर अचानक सगळ्यांनी अमितला सर जी हाक मारायला सुरुवात केली. पण माझ्याकडून असं कधीच झालं नाही. मी हे कधीच करू शकत नाही. येथूनच याची सुरुवात झाली.

या मुलाखतीत कादर खान म्हणाले की, ‘कोणी आपल्या मित्राला, भावाला दुसर्‍या नावाने कसं हाक मारू शकतं? हे अशक्य आहे. मला हे करता आले नाही आणि तेव्हापासून आपचं समीकरण पूर्वीसारखं राहिलं नाही. म्हणूनच मला हा गट सोडावा लागला. मी खुदा गवाहमध्ये नव्हतो. तेव्हा मी गंगा जमुना सरस्वती लिहीत होतो पण ते मी अर्ध्यावरच सोडलं. असे बरेच सिनेमे होते ज्यावर मी काम करण्यास सुरुवात केली पण नंतर सोडून दिले.

फार कमी लोकांना माहीत आहे की, अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन बनवण्याचं श्रेय कादर खान यांनाच जातं. शहेनशाह या सिनेमासाठी कादर खान यांनी संवाद लिहिले होते. कादर खान यांच्या नि-ध-ना-नंतर अमिताभ बच्चन यांनी एका ट्विटमध्ये याचा उल्लेख केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *