काय ! आलिया भट बदलतेय तिचे नाव आणि …

बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखविणारी प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टला आज कोणतीही ओळख गरजेची नाही. आलियाने तिच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आलिया भट्टने 2012 मध्ये रिलीज झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

यानंतर ‘राझी’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘कलंक’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करून ती इंडस्ट्रीची सुपरस्टार बनली. यानंतर तिने एप्रिल 2022 मध्ये प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न केले. मात्र, लग्नापूर्वी या जोडप्याने जवळपास 5 ते 6 वर्षे एकमेकांना डेट केले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता लग्नाच्या दीड महिन्यानंतर आलिया आई होणार आहे, अशा परिस्थितीत कपूर कुटुंबात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, आलिया भट्टने घोषणा केली की ती तिचे नाव बदलणार आहे. होय..आलिया आता तिचे नाव बदलणार आहे. नाव बदलले म्हणजे आलिया भट्ट ही आलिया भट्ट कपूर होईल. म्हणजेच ती पती रणबीर कपूरचे आडनाव जोडणार आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा करताना आलिया भट्ट म्हणाली की, मला असे करण्यात आनंद होईल.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर रणबीर कपूरने आलिया भट्टसोबत लग्न केल्यानंतर त्याच्या पासपोर्टवर वैवाहिक स्थिती बदलली आहे. याबद्दल बोलताना आलिया म्हणाली- “आता आपल्याला मूल होणार आहे. मला आता भट्ट व्हायचे नाही. कपूर कुटुंब एकत्र प्रवास करत आहे, तुम्हाला माहित आहे मला काय म्हणायचे आहे? मला एकटे पडल्यासारखे वाटून नाही घेयचे.

आलिया पुढे म्हणाली – मी नेहमीच आलिया भट्टच राहीन, पण आता मी कपूर देखील आहे. आलिया भट्ट पती रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मस्त्र’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात रिलीज होणार आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय सारखे स्टार्स देखील दिसणार आहेत. या चित्रपटाची अनेक गाणी रिलीज झाली आहेत, ज्यांना प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

याशिवाय आलियाकडे ‘रॉकी और रानी की लव्ह स्टोरी’, ‘हार्ट ऑफ स्टोन’, ‘जी ले जरा’ सारखे चित्रपट आहेत. याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘डार्लिंग’ या चित्रपटातही आलिया दिसली होती, ज्यामध्ये तिला चांगलीच पसंती मिळाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *