अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी खुशखबर, ‘हेरा फेरी 3’मध्ये ‘बाबू भैया’ आणि ‘श्याम’सोबत ‘राजू’ दिसणार?

अक्षय कुमारचा चित्रपट ‘हेरा फेरी 3’ परत येण्याची चिन्हे दिसत आहेत. वास्तविक, एका रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, चित्रपट निर्माते अक्षय कुमारशी सतत बोलत आहेत.

‘हेरा फेरी’ हा चित्रपट बॉलीवूडमधील लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. सध्या फिल्म फ्रँचायझी ‘हेरा फेरी 3’ चा तिसरा भाग सतत चर्चेत आहे. जेव्हापासून या चित्रपटात अक्षय कुमारच्या जागी कार्तिक आर्यन येणार असल्याची बातमी समोर आली, तेव्हापासून हा मुद्दा चर्चेत आला आहे. वास्तविक, परेश रावल म्हणाले होते की, कार्तिक आर्यन ‘हेरा फेरी 3’ चित्रपटाचा भाग असेल.

त्याचवेळी अक्षय कुमारने असेही म्हटले होते की, चित्रपटाच्या स्क्रिप्टमुळे तो यापासून दुरावत आहे. निर्मात्यांच्या या निर्णयामुळे अक्षय कुमारचे चाहते चांगलेच संतापले होते. ‘अक्षय नाही हेरा फेरी’ असंही चाहत्यांनी म्हटलं होतं. मात्र, आता ताज्या वृत्तानुसार अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरं तर, निर्माते पुन्हा एकदा अक्षय कुमारला ‘हेरा फेरी 3’ मध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘पिंकविला’च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, अक्षय कुमार ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटातून पुनरागमन करू शकतो. चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियादवाला ‘हेरा फेरी 3’ मध्ये अक्षय कुमारला परत आणण्यासाठी चर्चा करत आहेत. फिरोज नाडियाडवालाने गेल्या 10 दिवसांत अक्षय कुमारची अनेकदा भेट घेतली आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट बदलून अक्षय कुमारला परत आणण्याचा विचार निर्माते करत होते. अक्षय कुमार चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधत आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अक्षय कुमारचे 2022 मध्ये रिलीज झालेले पाच चित्रपट आहेत. यामध्ये ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षा बंधन’, ‘कठपुतली’ आणि ‘राम सेतू’ यांचा समावेश आहे. मात्र, त्याचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. आता अक्षय कुमार ‘सेल्फी’, ‘गोरखा’, ‘ओएमजी 2’, ‘कॅप्सूल गिल’, ‘सोराराई पोत्रू’च्या रिमेकमध्ये काम करताना दिसणार आहे. आता त्याच्या पाइपलाइनमध्ये आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *