अजय देवगणच्या भोलामधून पदार्पण करणार आहे ही बो’ल्ड अभिनेत्री, फोटो पाहून तुमचाही उठे….

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला असून या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘भोला’ हा त्याचा आगामी चित्रपट असून त्याचे शूटिंग सुरू आहे. साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेत्री अमला पॉल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

अमला पॉलने यापूर्वी तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2009 मध्ये, तीने मल्याळम चित्रपट निलथमाराद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिला तामिळ इंडस्ट्रीतील कामुक थ्रिलर चित्रपट सिंधू समवेली मधून लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला. या सर्व भाषांमध्ये काम केल्यानंतर आता ती बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करणार आहे. अमला तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या लूकमुळेही चर्चेत आहे. अजय देवगणसोबत या चित्रपटाचे शूटिंग केल्यानंतरही ती चर्चेचा भाग राहिली आहे. पाहूया तिचे ताजे फोटो.

अजय देवगणचा आगामी चित्रपट भोला हा तमिळ इंडस्ट्रीतील सुपरहिट चित्रपट कैथीचा रिमेक आहे. आणि या चित्रपटातील अमलाची व्यक्तिरेखा पाहण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. रिपोर्टनुसार, ती या चित्रपटात स्पेशल अपिअरन्समध्ये दिसणार आहे.

अमला पॉलने 4 तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये तीने नागा चैतन्यसोबत, एक रामचरणसोबत आणि अल्लू अर्जुनसारख्या सुपरस्टारसोबत एक स्क्रीन शेअर केली आहे. साउथ इंडस्ट्रीत अमला पॉलची खूप चर्चा आहे. तिच्या अभिनयासोबतच ती तिच्या लूकसाठीही चर्चेत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *