बॉलीवूड चित्रपटांची सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने 2007 मध्ये बच्चन कुटुंबाचे वारस अभिषेक बच्चन यांच्याशी लग्न केले. सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेकने अरेंज मॅरेज केले होते. याआधी दोघांनीही काही चित्रपटात एकत्र काम केले होते. अभिनेत्री ऐश्वर्या आता तिचे वैवाहिक जीवन आनंदाने जगत आहे. त्यांना आराध्या नावाची मुलगी आहे.
एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री ऐश्वर्याने तिच्या लग्नानंतरच्या वैवाहिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. हनीमूनला अभिषेकने तीच्यासोबत मोठा घोटाळा केल्याचे तीने सांगितले होते. अभिषेकने मौजमजा करण्यासाठी असे काही केले होते ज्यावर अभिनेत्रीला खूप राग आला आणि ती त्याच्यावर रागावली.
तिच्या हनिमूनबद्दल बोलताना ऐश्वर्या म्हणाली होती की, अभिषेकने माझी मस्करी उडवण्यासाठी बेडचे सर्व स्क्रू उघडले होते. मी बेडवर पडताच तो तुटला आणि त्याचबरोबर मी देखील खाली पडले. यामुळे मला त्याचा खूप राग आला होता. मी 2 दिवस त्याच्याशी बोलले ही नाही. अभिषेकने हे सर्व ऐश्वर्यासोबत विनोद करण्यासाठी केले होते.
ऐश्वर्याच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने लग्नानंतर फिल्म इंडस्ट्रीपासून दूर होण्यास सुरुवात केली. त्यामागचे कारण म्हणजे बच्चन कुटुंबाला त्यांच्या सुनेने चित्रपटात काम करावे असे वाटत नव्हते. एकदा अशी बातमी आली होती की ऐ दिल है मुश्किल या चित्रपटात ऐश्वर्याने रणबीरसोबत इं’टी’मे’ट सीन दिल्याने बच्चन कुटुंब संतापले. ऐश्वर्या रायचा हा शेवटचा चित्रपट होता.