बॉलीवूडच्या बच्चन कुटुंबातील अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकत आहे. आता नुकतीच ऐश्वर्या राय बच्चनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिला पनामा पेपर्स प्रकरणी ईडीने लेटर पाठवले आहे. तिला दिल्लीत चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या प्रकरणावरून अमिताभ यांच्या घरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. ऐश्वर्याला दिल्लीतील लोकनायक भवनासमोर हजर करण्यात येणार आहे.
पनामा पेपर्स प्रकरणी ईडी ऐश्वर्याची चौकशी करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी ऐश्वर्याला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची यादीही तयार केली आहे. या पेपर लीकमध्ये अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यासह अनेक भारतीय सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश होता. सर्व लोकांवर कर फसवणुकीचे आरोप होते.
वास्तविक, पनामा पेपर्स लीक प्रकरणात एका कंपनीची (मॉसॅक फोन्सेका) कायदेशीर कागदपत्रे लीक झाली होती. हा डेटा जर्मन वृत्तपत्र Süddeutsche Zeitung (SZ) ने 3 एप्रिल 2016 रोजी Panama Papers या नावाने प्रसिद्ध केला होता. त्यात 190 हून अधिक देशांतील राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटींची नावे होती, ज्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप होता. यामध्ये 1977 ते 2015 अखेरपर्यंतची माहिती देण्यात आली होती.
या कागदपत्रांमध्ये चित्रपट तारे आणि उद्योगपतींसह ५०० भारतीयांची नावे आहेत. यामध्ये बच्चन कुटुंबाचेही नाव समोर आले. ऐश्वर्या राय ही देशाबाहेरील कंपनीची संचालक आणि भागधारक असल्याचा दावा करण्यात आला होता. ऐश्वर्याशिवाय तिचे वडील, आई आणि भाऊही कंपनीत तिचे भागीदार होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत सांगितले होते की, पनामा पेपर्स लीक प्रकरणात भारतातील लोकांच्या एकूण 20,000 कोटी रुपयांच्या अघोषित संपत्तीचा खुलासा करण्यात आला आहे.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर, ऐश्वर्या राय बच्चनला यापूर्वी लेटर पाठवण्यात आले होते ज्यात तिला 15 दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगण्यात आले होते परंतु त्यानंतर ऐश्वर्याने त्यांना मेलद्वारे उत्तर पाठवले. यानंतर आता तिला पुन्हा लेटर पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. आता ऐश्वर्या राय काय विधान करते हे पाहावे लागेल.