मराठी चित्रपट सृष्टीला बॉलिवूड मध्ये मानाचे स्थान आहे. याचे कारण म्हणजे आपल्या मराठी चित्रपट सृष्टीने बॉलिवूडला अनेक अजरामर कलाकार दिले आहेत. मग ते पडद्यावरचे कलाकार असोत किंवा पडद्याआडचे. मराठी चित्रपट सृष्टी प्रमाणेच मराठी टेलिव्हिजन जगताचीही देशपातळीवर दखल घेतली जाते.
मराठी टेलिव्हिजन जगताच्या उदयाचं एकमेव कारण म्हणजे झी मराठी. झी मराठी वर आजवर इतक्या उल्लेखनीय मालिका आल्या आहेत ज्या आजही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. प्रादेशिक वाहिन्यांमध्ये सर्वाधिक टी आर पी ही झी मराठीचीच आहे. त्यामुळेच अनेक चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारही टेलिव्हिजन क्षेत्राकडे वळले आहेत.
आज आपण अशाच एका कलाकारबद्दल जाणून घेणार आहोत जो चित्रपटसृष्टी मध्ये दिग्गज कलाकार म्हणून ओळखला जात होताच.. परंतु आता त्याने मराठी टेलिव्हिजन मध्ये आपलं नशीब आजमवायचं ठरवलं आणि बऱ्याच प्रमाणात यश देखील मिळवलं आहे. चला तर जाणून घेऊयात कोण आहे हा अभिनेता..
मराठी सिनेसृष्टीतील बरेच कलाकार प्रसिध्द आहेत. त्यांपैकीच आपण आज बोलणार आहोत गिरीश ओक यांच्याबद्दल. गिरीश ओक हे खूप दशकांपासून मराठी सिनेसृष्टीत काम करत आहेत. बऱ्याच चांगल्या चित्रपटात आणि मालिकांमध्ये गिरीश यांनी काम केले आहे. गिरीश ओक हे एक डॉक्टर आहेत. गिरीश यांचा अभिनयही अतिशय उत्तम आहे.
सध्या सुरू असलेली आग्गबाई सासूबाई या मालिकेत गिरीश ओक हे शेफ अभितीज राजेची भूमिका साकारत आहेत. या मालिकेलाही प्रेक्षकांनी खूप पसंत केले आहे. तर आज आपण आग्गबाई सासूबाई मध्ये शेफ अभिजीत राजेची भूमिका करणाऱ्या गिरीश ओक यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. गिरीश ओक यांचा जन्म महाराष्ट्रातील नागपूर येथे झाला असून ते लहानाचे मोठेही नागपूर मध्येच झाले.
त्यांचे शालेय शिक्षण पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल मधून झाले. महाविद्यालयीन शिक्षण गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेजमधून पूर्ण झाले आहे. गिरीश ओक हे पेशाने डॉक्टर आहेत पण त्यांना त्याबरोबरच अभिनयाची खूप आवड होती त्यामुळे त्यांनी नंतर अभिनयही करायचं ठरवलं. सिनेसृष्टीत आता एकापेक्षा जास्त लग्न करणे हे नवीन नाहीये. गिरीश ओक यांची दोन लग्ने झाली आहेत.
पहिल्या पत्नीचे नाव पद्मश्री पाठक असून त्यांना एक मुलगीही आहे जिचे नाव अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले. गिरीजाही एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. तिचेही बरेच चित्रपट आणि मालिका आहेत. गिरीजाचे लग्न सुरत गोडबोले यांच्याबरोबर झाले आहे. सुरत हे देखील कलाकार क्षेत्रांतच कार्यरत आहेत.