आदिलला भेटून राखी सावंत झाली आनंदी, आनंदामध्ये केला रस्त्यावर पडून बो’ल्ड डान्स….

जगात काहीही सुरू असले तरी बॉलिवूड आयटम डान्सर राखी सावंत तिच्याच दुनियेत रमलेली असते. अलीकडेच तिचा प्रियकर आदिल दुर्रानी दुबईहून मुंबईत परतला आहे आणि आजकाल अभिनेत्री तिचा प्रियकर आदिल दुर्राणीसोबत प्रत्येक क्षण साजरा करत आहे. अलीकडेच तीने आदिलचे विमानतळावर गुलाबाच्या पाकळ्यांनी स्वागत करून त्याला मोठे सरप्राईज दिले.

आता तिचा असा एक व्हिडिओ शेअर होत आहे, ज्यामध्ये ती रस्त्यावर पडून डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत रंगीत जिम वेअरमध्ये दिसत आहे, जो पापाराझी विरल भयानीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की ही बॉलीवूड आयटम गर्ल जिममध्ये जात आहे, पण तिची नजर तिच्या आजूबाजूला धावणाऱ्या पापाराझींवर पडताच ती हॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर, गायिका बियॉन्से सारखी लगेच रस्त्यावर पडली. ती झोपल्याबरोबर हॉ’ट डान्स करते. हे पाहून तिचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून राखी सावंतच्या या आनंदाचे कारण म्हणजे तिचा प्रियकर आदिल दुर्रानी मुंबईला परतणे आहे, अशी प्रतिक्रिया लोक देत आहेत.

रणवीर सिंगच्या न्यू’ड फोटोशूटवर प्रतिक्रिया देताना राखी सावंतने रणवीर सिंगला ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली होती की, रणवीर सिंग न्यू’ड नाही, पण लोकांच्या नजरा न्यू’ड आहेत. तिने रणवीर सिंगसोबतच्या तिच्या इंस्टाग्राम चॅट्सही जाहीरपणे दाखवल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *