अभिनेत्रीचा खुलासा,म्हणाली-व्यावसायिकाने ‘पगारदार पत्नी’ बनण्यासाठी दिली होती 25 लाखाची ऑफर…….

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांचा २००५ मध्ये ‘गरम मसाला’ चित्रपट आला होता. या चित्रपटात तीन एअर होस्टेस होत्या, त्यापैकी एका एअर होस्टेसचे नाव ‘स्वीटी’ होते. स्विटी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव ‘नीतू चंद्रा’ आहे. नीतू चंद्रा यांनी बॉलिवूडच्या खूप कमी चित्रपटांमध्ये काम केले, त्यामुळे तिला फार कमी लोक ओळखतात, पण ‘गरम मसाला’ची ही एअर होस्टेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नीतू चंद्रा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केलेले वक्तव्य.

एकदा तिला एका मोठ्या उद्योगपतीने 25 लाख रुपये मासिक पगारावर पत्नी बनण्याची ऑफर दिली होती. ज्याला प्रोफेशनल भाषेत सॅलरी वाईफ म्हणतात म्हणजे पैसे देऊन बायको बनवणे. या वक्तव्यानंतर नीतू चंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आली असून तीच्या वक्तव्यावर मीडियामध्ये अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. तथापि, अभिनेत्रीने व्यावसायिकाचे नाव उघड केले नाही.

‘पगारदार बायको’ म्हणजे काय ? अनेक वर्षांपूर्वी अनिल कपूरचा एक चित्रपट आला होता – जुदाई पडद्यावर त्यांच्या पत्नीची भूमिका श्रीदेवीने केली होती, पण तिला कुटुंबापेक्षा पैसा जास्त आवडतो. दरम्यान, अनिल कपूरच्या प्रेमात पडलेल्या अनिल कपूरच्या बॉसची भाची उर्मिला मातोंडकर  यांची एंट्री होते, श्रीदेवीची पैशाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि अनिल कपूरशी लग्न करण्यासाठी ती त्याच्या पहिल्या पत्नीला पैसे देते आणि त्या बदल्यात ती अनिल कपूरशी लग्न करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *