एक चांगली मनासारखी नोकरी मिळावी असं प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येकाला वाटतं की एक चांगली नोकरी मिळावी ,जिथून स्वतःचे सर्व स्वप्न पूर्ण होवो. पण प्रत्येकाची ही इच्छा पूर्ण होतेच असं नाही. बऱ्याचवेळा असं बघायला मिळतं की माणूस अथक प्रयत्न करतो , परंतु यशस्वी होत नाही.
तसेच काही लोकं अशी असतात ज्यांना यश मिळता मिळता थोडक्यात राहून जातं. जर तुमच्या बाबतीत पण असंच काही होत असेल तर ज्योतिष ह्याबाबतीत तुमची मदत करू शकतो. आज आपण काही असे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या नोकरीच्या मध्ये येणारे अडथळे क्षणात दूर होतील. तर जाणून घेऊया ते उपाय,
जर तुम्हाला नोकरी मिळवण्यात अडथळे येत असतील किंवा एखाद्या क्षेत्रात काही अडचणी समोर येत असतील तर घरात हनुमानाची अशी प्रतिमा स्थापन करा ज्यात ते उडत असतील. ह्या स्थापन केलेल्या प्रतिमेची मनोभावे पूजा करावी व दर मंगळवारी बजरंग बाणाचे पठण करावे. ह्यामुळे नोकरी मिळण्यात येणारे अडथळे दूर होतील.
एका लिंबून ६ लवंग खोचून हातात धरावे आणि ओम श्री हनुमंते नमः ह्या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. मग ह्या लिंबाला बॅगेत ठेवावे , जी तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाणार आहात. हया उपायाने तुमचे बरेच अडथळे दूर होतील.
जर तुम्ही इंटरव्यूला जात असाल तर घरातुन निघायच्या आधी हनुमान चालीसाचे पठण करावे. हयाशिवाय आंघोळीच्या वेळी पाण्यात थोडी हळद टाकावी. त्यानंतर आपल्या इष्टदेवाच्या समोर दिवा आणि ११ अगरबत्त्या लावाव्यात. घरातून निघताना उंबऱ्याबाहेर प्रथम उजवा पाय टाकावा. सोबतच दही साखर खावी. ह्या उपायांमुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.