एक काळ होता जेव्हा 90 च्या दशकात अनेक अभिनेत्रींचे वर्चस्व होते. माधुरी दीक्षित, जुही चावला, श्रीदेवी, करिश्मा कपूर, ममता कुलकर्णी यासारख्या स्टार्स लोकांच्या हृदयावर राज्य करत असत. या दरम्यान, 1997 मध्ये ‘विश्वधाता’ आणि ‘विरासत’ यासारख्या चित्रपटांसह एकाा सुंदर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
ही अभिनेत्री दुसरी कोणीही नसून पूजा बत्रा ही होती. मॉडेलिंगच्या दुनियेतून तिने चित्रपटांचा मार्ग निवडला होता.पूजा बत्राचा जन्म 27 ऑक्टोबर 1975 रोजी झाला. तीचे वडील रवी बत्रा लष्करात कर्नल होते आणि आई नीलम बत्रा ने 1971 मध्ये झालेल्या मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता.
शालेय शिक्षण घेत असताना पूजा क्रीडापटू होती आणि तिने 200 आणि 400 मीटर डॅश पूर्ण केले होते. तिने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्रात पदवी घेतली. यानंतर, तीने पुण्याच्या सिम्बोसिस कॉलेजमधून मार्केटिंगमध्ये एमबीए पदवी प्राप्त केली. तिच्या सुरुवातीच्या काळात, पूजाने अर्धवेळ नोकरी म्हणून मॉडेलिंगला सुरुवात केली.
ती लिरिल साबण जाहिरातीसाठी प्रसिद्ध आहे. तिने 250 हून अधिक मॉडेलिंग कार्यक्रम आणि जाहिरात मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. 1993 हे वर्ष पूजासाठी खूप खास होते. या वर्षी तिने मिस इंडिया इंटरनॅशनलचा क्राऊन घातला. 1993 मध्ये, ती मिस एशिया पॅसिफिकमध्ये थर्ड रनरअप होती आणि त्यानंतर ती खूप लोकप्रिय झाली.
यानंतर पूजा बत्रा भारतातील टॉप मॉडेलपैकी एक बनली. विरासत फिल्म स्टुडिओसोबत करार करण्यापूर्वी तीने अनेक ऑफर नाकारल्या होत्या. याचे कारण तिला शिक्षण पूर्ण करायचे होते. यानंतर पूजा बत्राने चित्रपटांमध्ये प्रवेश केला. ती ‘विरासत’, ‘हसीना मान जाएगी’, ‘दिल ने फिर याद किया’ आणि ‘कहीं प्यार ना हो जाए’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली.
पूजा बत्रा देखील दक्षिण भारतीय चित्रपटांचा एक भाग होती. मात्र, तीला तेथे फारसे यश मिळाले नाही. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना, पूजाने 2002 मध्ये लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सोनू एस अहलुवालियाशी लग्न केले. मात्र, 2011 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर ती ‘लक्ष्य’, ‘डॉन 2’, ‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘दिलवाले’ फेम अभिनेता नवाब शाहसोबत रिलेशनशिपमध्ये आली.
4 जुलै 2019 रोजी दिल्लीतील आर्य समाजाच्या रीतीरीवजानुसार दोघांचे लग्न झाले. आजकाल पूजा तिचा पती नवाब शाहसोबत लाइफ एन्जॉय करत आहे. ती अनेकदा त्याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करते. ती आपला बराचसा वेळ योगासाठीही घालवते. लवकरच पूजा चित्रपटांमध्ये पुनरागमन करू शकते.