3 मुलं असणाऱ्या माणसाच्या प्रेमात वेडी झाली होती ही अभिनेत्री, घरच्यांच्या विरोधात जाऊन असकाही करून बसली होती…

असे म्हटले जाते की प्रेमात जात, धर्म आणि वय याला काही महत्व नसते. याची अनेक उदाहरणे आजही चित्रपटसृष्टीत अस्तित्वात आहेत आणि दशकांपूर्वीही होती. बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी आपले प्रेम शोधण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीची ओळख करुन देणार आहोत जिने तिच्या वडिलांच्या आणि कुटुंबाच्या विरोधात जाऊन 3 मुलांच्या वडिलांशी लग्न केले.

मीना कमल अमरोहीच्या प्रेमात झाली होती वेडी – असे म्हटले जाते की ५० च्या दशकाची सुप्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी दिग्दर्शक कमल अमरोहीच्या प्रेमात एवढी वेडी झाली होती होती की तिने तिच्या वडिलांच्या विरोधात जाऊन दोन तासाच्या आतच लग्न केले होतं. वास्तविक कमल अमरोहीने मीनाला ‘अनारकली’ चित्रपटात साइन केले होते.हा अगदी कमी बजेटचा चित्रपट होता आणि वेळेवर पूर्ण झालेली नव्हती. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मीना कुमारीचा अपघात झाला होता. जेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा अमरोही तिला भेटायचे. यावेळी,रुग्णालयात त्यांची प्रेमकथा सुरू झाली.

हे नाते मीनाच्या वडिलांना आवडले नाही – हॉस्पिटलमधून प्रेमकथा सुरू झाल्यानंतर मीना आणि अमरोही रोज एकमेकांना पत्र लिहायला लागले. मात्र,मीनाच्या वडिलांना कमल अमरोहीची जवळीकता आवडत नव्हती. कारण कमल अमरोही आधीच विवाहित होता आणि त्याला तीन मुले देखील होती. असे असूनही मीना अमरोहीच्या प्रेमात पडली. हे प्रकरण इतके वाढले होते की दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा विचार केला होता.

२ तासात लग्नाची व्यवस्था करण्यात आली होती – अपघातानंतर मीना कुमारी दररोज क्लिनिकमध्ये वडिलांसोबत मसाज करायला जात असे. एके दिवशी मीनाला तिच्या वडिलांनी क्लिनिकच्या बाहेर सोडले तेव्हा ती थेट आपल्या बहिणीसोबत कमल अमरोहीच्या घरी गेली आणि २ तासातच तिचे लग्न ठरले. मात्र लग्नानंतर १२ वर्षानंतर मीना कुमारी आणि कमल अमरोही १९६४ मध्ये विभक्त झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *