1 वर्षही नीट टिकू शकले नाही या बॉलिवूड स्टार्स चे लग्न संबंध, असे लग्न की झाला असा घटस्पोट!!

असे म्हटले जाते की विवाह हे 7 जन्मांचे बंधन असते. विशेषतः बॉलिवूड इंडस्ट्री मधून ब्रेकअप आणि घटस्फोटाच्या बातम्या येत राहतात. मात्र, अमिताभ बच्चन-जया बच्चन, शाहरुख खान-गौरी खान असे काही कलाकार आहेत ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य एकाच जोडीदारासोबत आनंदाने घालवले आहे.

रेखा आणि मुकेश अग्रवाल
रेखा तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दल जितकी चर्चेत होती तितकीच तिची पर्सनल लाइफही चर्चेत होती. रेखा ने 1990 मध्ये मुकेश अग्रवाल नावाच्या व्यक्तीशी लग्न केले होते. दोघांनी स्वतःच्या मर्जीने हे लग्न केले होते. त्यांनी एकमेकांना डेटिंंग सुद्धा केेलं होते, लग्नाचे काही दिवस चांगले गेले, पण नंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला.

वास्तविक मुकेशला ग्लॅमरस आयुष्य आवडायचे तर रेखा त्याला कंटाळली होती. अशा परिस्थितीत दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, मुकेशला व्यवसायात तोटा सहन करावा लागला आणि तो काही शारीरिक समस्यांशीही झगडत होता. यामुळे त्याने 2 ऑक्टोबर 1990 रोजी आत्महत्या केली. अशा प्रकारे रेखाचे लग्न केवळ 7 महिने टिकू शकले.

करण सिंह ग्रोव्हर आणि श्रद्धा निगम
बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी करण सिंग ग्रोव्हर टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध कलाकार होता. मग तो श्रद्धा निगमच्या प्रेमात पडला. दोघांनी लग्न केले. मात्र, हे लग्न अवघ्या 10 महिन्यांतच तुटले. यानंतर करणने आणखी दोन विवाह केले पण तेही घटस्फोटावर संपले. सध्या तो बिपाशा बासूसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहे.

मंदाना करीमी आणि गौरव गुप्ता
मॉडेल आणि अभिनेत्री मंदाना करीमीने 25 जानेवारी 2017 रोजी बिझनेसमन गौरव गुप्तासोबत लग्न केले. त्या लग्नाचा भव्य सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. पण लग्नाच्या केवळ 6 महिन्यांतच मंदानाने गौरववर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला.

पुलकित सम्राट आणि श्वेता रोहिरा
बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राटने नोव्हेंबर 2014 मध्ये त्याची प्रेमिका श्वेता रोहिरासोबत लग्न केले. परंतु 11 महिन्यांच्या आत हे लग्न घटस्फोटापर्यंत पोहोचले. पुलकितची यामी गौतमसोबत वाढती जवळीक हे लग्न मोडण्यामागचे कारण असल्याचे म्हटले जाते.

सारा खान आणि अली मर्चंट
टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री सारा खानने ‘बिग बॉस सीझन 4’ मध्ये अली मर्चंटसोबत लग्न केले. 2010 च्या शेवटी त्यांचे लग्न झाले होते. पण लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांत हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. या घटस्फोटासाठी दोघांची स्वतःची कारणे होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *