टारझन दि वंडर कार या चिपत्रपटातील अजय देवगणच्या ऑनस्क्रीन मुलाची पत्नी आहे ही अभिनेत्री!!

हिंदी चित्रपटसृष्टीत यश मिळवणे कोणत्याही कलाकारासाठी सोपे नसते. बॉलिवूडमध्ये ओळख स्वतःच बनवली जाते आणि ज्यांना असे करण्यात यश मिळत नाही, त्यांना इंडस्ट्री काढून टाकतो. वत्सल सेठ आपल्या पहिल्याच चित्रपटामुळे हिट झाला होता, पण नंतर तो बरबाद झाला. त्याला पहिल्या चित्रपटात जसे यश मिळाले तसे यश त्याला मिळाले नाही आणि हळूहळू तो हिंदी चित्रपटसृष्टीतून गायब झाला.

वत्सल सेठ, 41 वर्षांचा झाला आहे, त्याचा जन्म 5 ऑगस्ट 1980 रोजी मुंबईत झाला. मुंबईत जन्मलेला वत्सल सेठ मुंबईत वाढला आणि त्याचे एज्युकेशन ही याच शहरात झाले. अभिनेत्याने छोट्या पडद्यापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. 1996 मध्ये तो जस्ट मोहब्बत या दूरचित्रवाणी मालिकेत दिसला होता. नंतर त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. पण खेद आहे की तो हिंदी चित्रपटसृष्टीत हिट होऊ शकला नाही.

वत्सल सेठ ने ‘जस्ट मोहब्बत’ मध्ये सुमारे 4 ते 5 वर्षे काम केले. 1996 ते 2000 पर्यंत तो या शोचा भाग होता. यानंतर, 2004 मध्ये, अभिनेत्याने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्याचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘टार्झन द वंडर कार’ होता. हा चित्रपट लोकांना खुप आवडला होता. ‘टार्झन द वंडर कार’मध्ये वत्सल सेठची नायिका आयशा टाकिया होती. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आणि दोघांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली होती.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता अजय देवगण याचीही या चित्रपटात छोटी भूमिका होती. अजयने वत्सलच्या वडिलांची भूमिका साकारली होती. चित्रपट हिट झाल्यानंतर वाटले की वत्सल बॉलिवूडमध्ये चांगले काम करत राहील आणि त्याची कारकीर्द पुढे जाईल, पन तसे होऊ शकले नाही. या चित्रपटानंतर तो अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला पण त्याला ‘टार्झन द वंडर कार’ मधून मिळालेले यश मिळू शकले नाही.

2014 मध्ये वत्सल सेठ छोट्या पडद्यावर परतला आणि ‘एक हसीना थी’ या मालिकेत दिसला . ही मालिका हिट ठरली आणि वत्सलनेही आपल्या उत्कृष्ट कामाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. अभिनेत्री संजीदा शेखने या मालिकेत अभिनेत्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. नंतर ते 2016 मध्ये रीस्त्तो का सौदागर बाजीगर’ या मालिकेतही दिसले आहेत.

वत्सल सेठच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर 2017 मध्ये त्याने इशिता दत्ताशी लग्न केले होते. इशिता एक अभिनेत्री देखील आहे आणि तिने अनेक मालिका आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. वत्सल हा इशिता दत्तापेक्षा सुमारे 10 वर्षांनी मोठा आहे. वत्सल आणि इशिता एकत्र आनंदी जीवन जगत आहेत आणि दोघेही मुंबईत राहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *