‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट,नवरी बाईने फोटो केले शेअर!!

‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाल्यानंतर संजनाला वेध लागले आहेत ते तिच्या आणि अनिरुद्धच्या लग्नाचे.

अनिरुद्धबरोबर लग्नगाठ बांधून देशमुखांच्या घरात गृहप्रवेश करण्याचं संजनाचं स्वप्न पूर्ण होणार का याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या लग्नाच्या निमित्तानं संजना नटण्याची सर्व हौस भागवून घेणार आहे. गुलाबी रंगाच्या साडीतला तिचा ब्रायडल लूक समोर आला आहे.

मालिकेतल्या संजनाच्या लूकची नेहमीच चर्चा होत असते. त्यामुळे लग्नासाठीही तिनं खास तयारी केलीय. गुलाबी रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य आणखीच खुलून आलं आहे. अनिरुद्धच्या नावाची मेहेंदीही तिच्या हातावर सजली आहे

संजनाचा देशमुख कुटुंबियांना अल्टीमेटम!
अनिरुद्ध पुन्हा गायब झालेला पाहून संजना प्रचंड संतापली आहे. यावेळी तिने समृद्धी बंगल्यात येऊन तमाशा केला आहे. संजनाने अनिरुद्धला फितवल्याचा आरोप अरुंधतीवर केला आहे. तूच अनिरुद्धला माझ्या विरोधात भडकवलंस आणि त्याला कुठेतरी पाठवलंस असा आरोप तिने अरुंधतीवर केला आहे.

तसेच जर अनिरुद्ध आला नाही आणि आमचं लग्न झालं नाही तर मी संपूर्ण देशमुख कुटुंबाला सोडणार नाही, त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करेन, अशी धमकी देखील तिने यावेळी दिली आहे. मात्र, देशमुखांना देखील अनिरुद्ध कुठे गेला आहे? आणि का गेला आहे, याबद्दल काहीही माहिती नाहीये. तर, दुसरीकडे यावेळी तरी संजना आणि अनिरुद्धचं लग्न होणार की नाही, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *